*पहिल्याच दिवशी भैरवनाथ नगर (गोंधवणी) येथे आठवडे बाजारास नागरिकांची प्रचंड गर्दी….*

*पहिल्याच दिवशी भैरवनाथ नगर (गोंधवणी) येथे आठवडे बाजारास नागरिकांची प्रचंड गर्दी….*
*भैरवनाथ प्रतिष्ठानचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक…*
श्रीरामपूर : भैरवनाथनगर (गोंधवणी) येथे भैरवनाथ प्रतिष्ठान व ग्रामपंचायत भैरवनाथ नगर महादेव ट्रस्ट यांच्या सहकार्याने रविवारी सुरू केलेल्या आठवडे बाजारास पहिल्याच दिवशी बहुसंख्येने गर्दी दिसून आली आहे . गावठान परिसरातील व शेजारच्या गावातील नागरिकांची व त्यात महिला मंडळ बहुसंख्येने सहभागी होत्या.
महिला व नागरिकांना तीन ते चार किलोमीटर दूर अंतरावर दुसरीकडे बाजारासाठी जावे लागत असे.
भैरवनाथनगर येथे दर रविवारी आठवडे बाजारास सुरूवात झाल्याने महिला वर्गात , परिसरातील नागरिकांत मोठा आनंद दिसून येत आहे.
शेतकरी , ग्रामस्थ , व्यावसायिक यांनी उपक्रमाबाबत आनंद , समाधान व्यक्त केले आहे.
यासाठी भैरवनाथ सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब गायकवाड,अध्यक्ष श्री सुखदेव देवकर , उपाध्यक्ष श्री अनिल वायकर , खजिनदार श्री सुनिल नेरकर , श्री रवी आसने , सचिव श्री राजू चौधरी , सदस्य श्री राजेंद्र लबडे, श्री बंटी थोरात , श्री प्रकाश लबडे , श्री महेश जगताप , श्री हरिश्चंद्र लबडे, श्री नितीन करंडे , श्री मधुकर लबडे, श्री अरूण लबडे, श्री विजय पाचारे , श्री बाळासाहेब शेळके ,श्री वहाडणे , डॉ.भगत, श्री अमोल लबडे , श्री सतिश गायकवाड ,सलिमभाई पठाण , श्री गणेश लबडे , श्री सुभाष लबडे, आदिंचे विशेष परिश्रम व बहुमोलाचे योगदान लाभले आहे.