लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा— जिल्हा सत्र न्यायधीश एस आर यादव.
लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा— जिल्हा सत्र न्यायधीश एस आर यादव.
लोक न्यायालयात होणारा निवाडा आपसात समजुतीने होत असतो. लोक न्यायालयामुळे वेळ व पैसा वाचतो. शक्यतो वाद करू नये, वाद टाळावेत वाद झाला तर तो समोपचाराने सोडवावा. येत्या १२ तारखेला लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आलेले असून लोक न्यायालयाचा
लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सत्र न्यायधीश एस आर यादव यांनी केले.
टाकळीभान ग्रामपंचायतच्या स्व. गोविंदराव आदिक सभागृहात तालुका विधी सेवा समिती, श्रीरामपूर व वकिल संघ, श्रीरामपूर तसेच पंचायत समिती, श्रीरामपूर यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वसानिमित्त आयोजीत कायदेशीर जनजागृती शिबीर कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते यावेळी न्यायधीश यादव अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी सह दिवाणी न्यायधीश श्रीमती एस व्ही मोरे, दिवाणी न्यायधीश डी. पी. कासट, अॅड. सौ. मनिषा उंडे सदस्य वकील संघ श्रीरामपूर, विशेष सहा.
सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीमती शिल्पा चिंतेवार,
सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे,
ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने
न्यायधीश यादव, कासट, श्रीमती मोरे व आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी बोलतांना न्यायधीश यादव पुढे म्हणाले
की, झालेले वाद समोपचाराने सोडवावेत. कोर्टात दाखल न झालेली प्रकरणे देखील लोकन्यायालयात
निवाडा होतो.लोकन्यायालयात होणारा निवाडा अंतीम असतो त्याविरूद्ध अपील करता येत नाही त्या
मुळे तुमच्या भांडणाला पुर्णविराम मिळत असल्याने
आपले वाद लोकन्यायालयात सोडवावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी न्यायधीश श्रीमती एस व्ही मोरे यांनी
कायद्या बाबत माहिती दिली.
अॅड. शिल्पा चिंतेवार यांनी हुंडा प्रतिबंधक कायद्या बाबत माहिती दिली. अॅड. मनिषा उंडे यांनी
मनोगत व्यक्त केले.
यावेळी अॅड. प्रमोद वलटे, अॅड. दिपक कोकणे, अॅड. रत्नाकर रणनवरे, अॅड. प्रल्हाद खडागळे, अॅड. महिंद्रा आढव, अॅड. विजय बोर्डे,
अॅड. अतुल चौधरी, अॅड. गणेश सिनारे काँग्रेसचे
तालूका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, युटेक कारखाना संचालक केरूबापू मगर, अशोक कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, आबासाहेब रणनवरे,
बापूसाहेब शिंदे, जयकर मगर, संदिप जावळे, रमेश
कोकणे, नारायण काळे, भाऊसाहेब पटारे, सुनिल बोडखे, शिवाजी पवार, जालिंदर हुळहुळे, बाबा सय्यद
नंदु रणनवरे, कचरू पवार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. प्रमोद वलटे यांनी केले तर आभार अॅड. दिपक कोकणे यांनी मानले.
टाकळीभान— येथील ग्रामपंचायतमध्ये कायदेशीर जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिहा सत्र न्यायधीश एस आर यादव व उपस्थित न्यायधीश डी पी कासट, न्यायधीश श्रीमती एस व्ही मोरे आदी.