यांच्या विशेष प्रयत्नातून मानोरी गावाकरीता सुमारे 5 कोटी 17 लक्ष रुपयांचा निधी

यांच्या विशेष प्रयत्नातून मानोरी गावाकरीता सुमारे 5 कोटी 17 लक्ष रुपयांचा निधी
राहुरी तालुक्यातील मानोरी येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून मानोरी गावाकरीता सुमारे 5 कोटी 17 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.. यावेळी मानोरी गावातील युवक कार्यकर्त्यांनी लाडके आमदार प्राजक्ता दादा तनपुरे यांच्या समवेत शंभरहून अधिक मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्यानंतर विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम लोकनियुक्त सरपंच हाजी आब्बास शेख (दयावान) हे होते. तर व्यासपीठावर मा.उपसभापती रविंद्र आढाव, मानोरी ग्रामपंचायत उपसरपंच शकुंतला ताई आढाव, सुरेश निमसे, बाळासाहेब खुळे, अदिनाथ तनपुरे, सुनिल आडसुरे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड, सुरेश मकासरे, दिलीप इंगळे, प्रकाश देठे, सचिन भिंगारदे, डाॅ.राजेंद्र पोटे,भारत तारडे, गहिनाथ पेरणे, संभुगिरी महाराज गोसावी, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आढाव, सोसायटीचे विद्यमान संचालक नवनाथ थोरात, तंटामुक्ती माजी अध्यक्ष बाजीराव आढाव, डॉक्टर तनपुरे कारखान्याची माजी संचालक निवृत्ती नाना आढाव माजी उपसरपंच संजय पोटे माजी चेअरमन बाळू काका वाघ पाणी वापर संस्थेचे विद्यमान संचालक बाळासाहेब पोटे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अण्णासाहेब तोडमल शिवाजी थोरात शामराव आढाव दिलावर पठाण सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पोटे संजय डोंगरे माजी सैनिक श्रीकांत थोरात मेजर दयावान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष नसीर भाई शेख दयावान एडवोकेट पैलवान संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते डाॅ.बाबासाहेब आढाव सामाजिक कार्यकर्ते रवींद्र निवृत्ती आढाव सोसायटीची माजी चेअरमन दादासाहेब आढाव सोसायटीचे माझी व्हाईस चेअरमन विलास थोरात तंटामुक्ती माजी अध्यक्ष बाबासाहेब आढाव ज्ञानेश्वर खुळे पीरखा भाई पठाण भाऊ चोथे सोसायटीचे विद्यमान संचालक भास्कर भिंगारे अण्णासाहेब ठुबे माजी उपसरपंच मनोज ठुबे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय आढाव भाऊराव पोटे इब्राहिम पठाण आलम पठाण दादासाहेब चोथे सुभाष आढाव सोसायटीचे विद्यमान संचालक देविदास वाघ अक्षय पोटे रासबचे गंगाधर बाचकर अमोल भिंगारे बाळासाहेब कोहकडे केबी शेख बाबुराव मकासारे दूल्हे का पठाण जमाल पठाण अनिल ठुबे किशोर आढाव साहिल पठाण शामत शेख गावातील व पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानोरी-मांजरी ते पठाण वस्ती रस्ता खडीकरण, जुना टाकळीमिया रस्ता ते पठाण वस्ती खडीकरण, जलजीवन मिशन अंतर्गत अंतसंकल्प तरतूद २०२२ अंतर्गत सुधारित पाणी योजना, मानोरी ते खिळे वस्ती मालुंजे खुर्द रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मानोरी ते गणपत वाडी रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण आधी विविध विकास कामांचा माजी मंत्री प्राजक तनपुरे यांच्या हस्ते शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा हा संपन्न झाला. प्रसंगी आ तनपुरे म्हणाले की, मानोरीतील मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्त्याचा उद्घाटन करत असताना या बोर्ड मागे दुसरा बोर्ड दिसला त्यांना विचारा आता की रस्त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.तर दुसरीकडे हे सरकार सत्तेत आल्यापासून सर्वत्र या मतदारसंघात खडी क्रेशर बंद झाले आहे त्यामुळे अनेक विकास कामे देखील थांबले आहेत आता तरी विकास कामे करण्यासाठी हे सुरू करा असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नामउल्लेख टाळत तनपुरे यांनी लगावला आहे. याप्रसंगी आदिवासी बांधवांना जातीचे दाखले व रेशन कार्ड वाटप तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर आभार डाॅ. बाबासाहेब आढाव यांनी मानले.