संगमेश्वर माध्यमिक विद्यालय (बोरी फाटा) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा.
संगमेश्वर माध्यमिक विद्यालय (बोरी फाटा) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा.
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील अतिशय शिस्तबद्ध व शैक्षणिक क्रीडा व अध्यात्माच्या परिपूर्ण असे ज्ञान देणाऱ्या श्री संगमेश्वर माध्यमिक विद्यालय वांजुळपोही बोरी फाटा विद्यालयांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कबड्डी खो-खो धावणे लिंबू चमचा झाड लावणे त्यांचे संगोपन करणे माहिती तसेच शाळेमध्ये विविध अभ्यासक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख स्वरूपात बक्षीस तसेच प्रमाणपत्र वितरित करून मुलांमध्ये खेळ व अभ्यासाप्रती असता निर्माण करण्याचे कार्य या विद्यालयामार्फत करण्यात येते. विद्यालयाने कायमच उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले आहे व करत आहे संगमेश्वर महाविद्यालया मध्ये शिक्षण घेऊन खूप विद्यार्थी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कार्य करत आहेत तर काही इतर सरकारी नोकरी करतात काही उत्तम व्यावसायिक बनले या शाळेमधून शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी आज भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील साता समुद्रा पार या शाळेचे नाव घेऊन गेल्याचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे श्री वाबळे सर व पवार सर यांनी बोलून दाखवले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष विष्णुपंत ठोसर धनराज जगताप राजेंद्र जगताप स्कूल कमिटी अध्यक्ष एकनाथ पवार रामभाऊ पवार ज्ञानदेव घोडके मुख्याध्यापक श्री बर्डे सर जाधव सर व इतर शिक्षक स्टाफ आदींनी केले तसेच विष्णुपंत ठोसर यांनी ध्वजारोहण केले त्यानंतर विद्यार्थी व पंचक्रोशीतील भाषणे झाली त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमानंतर कार्यक्रमाच्या समारोप झाला यावेळी माजी विद्यार्थी रुद्रा न्यूज संपादक नारायण चोरमले तसेच नगर अर्बन संस्थेचे सर्वे सर्वा चेअरमन श्री अनिल गरदरे उद्योजक श्री विकास कांगणे तसेच पंचक्रोशीतील पालक विद्यार्थी उपस्थित होते.