पुणे येथे “भेर्डापूर कट्टा ” स्थापना

पुणे येथे “भेर्डापूर कट्टा ” स्थापना
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून पुण्यात वास्तव्यास अनेक नागरिक असून त्यांनी पुणे शहरात “भेर्डापूर कट्ट्याची” स्थापना केली असून भेर्डापूर हे श्रीरामपूर मधील एक खेडे गाव आहे.
भेर्डापूर परिसरातील पुणे येथे राहत असणारे नागरिक, मित्र परिवार यांना जोडणारा दुवा म्हणून हक्काचा “भेर्डापूर कट्टा” या नावाने स्थापन करण्यात आला आहे.
“भेर्डापूर कट्टा “स्थापन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गावाकडील नागरिक एकत्र आल्याने प्रेम , संपर्क ह्या बरोबर एक वैचारिक अधिष्ठान निर्माण होऊन मदतीची भावना वृद्धिंगत होते .
सदर “भेर्डापूर कट्ट्याची” ठरल्याप्रमाणे दुसरी मीटिंग हॉटेल संदीप, चंदननगर येथे रविवार दि १७ जुलै ला दुपारी १२ वाजता आयोजित केली होती. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.
मीटिंगच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे : श्री आशिषजी माने कार्याध्यश, माहिती अधिकार विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे शहर ,संयोजक व सदस्य, नगररोड कट्टा, वडगावशेरी श्री. राजाभाऊ चव्हाण प्रचार व प्रसिद्धी प्रमुख भाजप शिरूर तालुका श्री. आबासाहेबजी पऱ्हाड प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य आय टी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी श्री महेश बडाख तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. प्रतापराव कवडे, उपसरपंच, ग्रा.पं .भेर्डापूर श्री. प्रा.बाबासाहेब पवार सर, सदस्य ग्रा. पं .भेर्डापूर श्री. सुनील पवार, अध्यक्ष युवा मल्हार सेना, मध्य महाराष्ट्र श्री. लक्ष्मणराव कसबे सर, जिल्हा मार्गदर्शक छावा संघटना, अहमदनगर, श्री बाळासाहेब धनवटे श्रीरामपूर तालुका भाजपा कार्यकर्ते,
कैलास कवडे , विशाल गायकवाड,प्रमोद कोकणे, योगेश घोडेकर, आदिनाथ धनवटे, संजय कसबे, गौरव पवार,सतिष दांगट आदींची उपस्थिती होती.
श्री अजय जी गलांडे पाटील यांनी मीटिंगसाठी हाॅटेल संदिप, चंदननगर, वडगावशेरी, पुणे उपलब्ध करून दिले म्हणून
“भेर्डापुर कट्टा”, पुणेचे सर्व सदस्य परिवाराच्या वतीने श्री अजय जी गलांडे पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहे
सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यक्रमाचे मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे यांचा शाल , पुष्प ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.