मुठेवाडगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंचासह काही सदस्य ही अपात्र
मुठेवाडगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंचासह काही सदस्य ही अपात्र
श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव ग्रामपंचायत मध्ये आमदार लहू कानडे गटाचे सत्ताधारी सरपंच उपसरपंच अपात्र झाल्याने एकमेव महिला सदस्य पंचायतीमध्ये राहिले असून विरोधी विखे मुरकुटे गटाचे सहा सदस्य पात्र राहिले आहेत. मुठेवाडगाव ग्रामपंचायत निवडणूक 2021 मध्ये होऊन नऊ सदस्य संख्या बळात आमदार कानडे गटाचे पाच सदस्य तर विखे-मुरकुटे गटाचे चार सदस्य निवडून आले. सागर ज्ञानदेव मुठे व बहुमतातील आमदार कानडे गटाचे लोकनियुक्त सरपंच झाले. तर निर्मला पाचपिंड उपसरपंच झाल्या निवडणुकीनंतर ग्रामपंचायतची सूत्रे हातात ठेवणाऱ्या परिवारातील एक महत्त्वाचे उमेदवार पडल्याने हा पराभव जिव्हारी लागला. त्यामुळे सव्वा महिन्यात त्या जागेवर निवडून आलेल्या लंकाबाई दिनकर मुठे यांच्यावर प्रथम अतिक्रमण केस दाखल केली. इथून पुढे कायम दोन्ही गटाने एकमेकांच्या सदस्याविरुद्ध एकमेव अतिक्रमण या मुद्द्यावरच अखेर तब्बल पावणेचार वर्ष घेरण्यास सुरुवात केली.
सदस्या लंका मुठे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमणाची तक्रार दाखल केली म्हणून विखे मुरकुटे गटाने गोरख जाधव व उज्वला दिघे या आमदार कानडे गटाच्या सदस्याविरुद्ध अतिक्रमणक केस दाखल केली या पहिल्या केस मध्ये आमदार कानडे गटाचे सदस्य अपात्र झाले तर विखे मुरकुटे गटाच्या लंका मुठे यांच्या बाजूने निकाल लागल्याने त्या पात्र राहिल्या या निकाला विरोधात कानडे गटाने नाशिक उपायुक्त यांच्याकडे अपील करूनही दोन्ही सदस्य अपात्र राहिले छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात केस दाखल करण्यात येऊनही मिरीट वर दोन्ही सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले. पुढे दोन जागांची पोटनिवडणूक होऊन विखे मुरकुटे गटाने दोन्ही जागा पटकावल्या विखे मुरकुटे गटाचे सूत्रधार डॉक्टर शंकर मुठे यांच्या पत्नी संगीता शंकर मुठे व किशोर साठे हे मताधिक्याने विजयी झाले. या पोटनुक निवडणुकीत सरपंच सागर मुठे यांनी संगीता शंकर मुठे यांच्या विरुद्ध अतिक्रमण तक्रार दाखल केली निवडणूक अधिकाऱ्यांनी ती तक्रार फेटाळून लावल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले हे अपील करताना ज्ञानेश्वर जयवंत मुठे व अनिल रमेश मुठे या दोन सदस्याविरुद्ध ही तक्रारी दाखल केल्या त्यामध्ये त्यांचे अर्ज फेटळल्याने दोघेही पात्र राहिले पुढे नाशिक उपायुक्त अपिलातही ते पात्र राहिले नंतर लंका मुठे यांच्याविरुद्ध पुन्हा तक्रार दाखल केल्याने विखे मुरकुटे गटाने उपसरपंच विजया भोंडगे यांच्याविरुद्ध घरकुल अतिक्रमण तक्रार दाखल केली जिल्हाधिकारी निकालात त्या अपात्र ठरल्या नाशिक उपयुक्त अपिलात त्यांना स्थगिती मिळाली.
यादरम्यान सदस्य ज्ञानेश्वर जयवंत मुठे यांनी सरपंच सागर मुठे यांच्या वडिलांनी मोठे वडगाव माळवाडगाव शिव रस्त्यावर गट क्रमांक 18 जमिनीतून अतिक्रमण केल्याचे तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली या केस चा निकाल लागण्यापूर्वी सरपंच मुठे यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली परंतु ती फेटळण्यात आली उपसरपंच विजया भोंडगे यांच्या विरुद्ध नाशिक उपयुक्त कडे नवीन अपील दाखल करण्यात आले होते. त्या अपिलात उपायुक्त सागर निलेश यांनी उपसरपंच विजया भोंडगे यांच्याविरुद्ध जिल्हा अधिकारी यांचा निकाल जैसे थे ठेवून त्यांना अपात्र ठरविले.
विखे मुरकुटे गटाच्या वतीने अहमदनगर नाशिक येथे एडवोकेट अमोल धोंडे यांनी काम पाहिले. तर छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात एडवोकेट विवेक तारडे यांनी काम पाहिले. आता मुठे वाडगाव ग्रामपंचायत मध्ये सहा जागा विखे मुरकुटे एक जागा आमदार कानडे गट तर दोन जागा अपात्र असे नऊ जागां आहे या निकालामुळे ग्रामपंचायत मध्ये आपली सत्ता येणार असल्याने विखे मुरकुटे गटात आनंदाचे वातावरण आहे.
मुठेवाडगाव चे सरपंच सागर मुठे यांच्या वडिलांनी जमिनीलगतच्या शिवरस्त्यावर अतिक्रमण केले तेच विरोधी पार्टीने बरोबर हेरले व केलेल्या अतिक्रमणाचे कागदोपत्री पुराव्यावरून जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी सरपंच सागर मुठे यांना अपात्र घोषित केले. तर उपसरपंच विजया भोंडगे यांचेही सरकारी जागेवर घरकुलाचे अतिक्रमण सिद्ध झाल्याने नाशिक उपआयुक्त सागर निलेश यांनी विजया भोंडगे यांनाही अपात्र ठरविले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील बऱ्याचश्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यविरोधात केसेस चालू असून आता कोणत्या ग्रामपंचायतीचा निकाल लागतो व कोणाच्या विरोधात लागतो हे येणाऱ्या काळातच कळेल.
मुठेवाडगाव ग्रामपंचायत मध्ये आता हा अतिक्रमण केसचा सिलसिला पुढे थांबणार की सुरूच राहणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे