*स्त्रीला मोकळा श्वास घेता येण हेच तीच स्वातंत्र्य असत*
*स्त्रीला मोकळा श्वास घेता येण हेच तीच स्वातंत्र्य असत*
मोकळा श्वास घेणं म्हणजे आपलं स्थान दुय्यम असल्याची जाणीव न होणे . परावलंबी आहेत हि भावना चुकुन सुद्धा मनात न डोकावण सामाजिक पातळीवर वावरत असताना कोणत्याही ठिकाणी आपण दुय्यम आहेत याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाणीव न होणे. किंवा इतरत्र कोणाकडून तसा संकेत न मिळणं वा तशी जाणीव करून न देणं हेच स्त्रीच् स्वतंत्र्य आहे . पुरुष समाजात वावरत असताना पुरुषाला कोणीही दुय्यम समजत नाही.पुरूष समाजात मोकळा श्वास घेऊ शकतो. आणि हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं आपण जर समजतो .तर मग जेव्हा आपल्या सारखंच आपल्या सोबत वेगवेगळ्या नात्याने असणार व्यक्तिमत्व म्हणजे स्त्री तिच्या संदर्भात मात्र आपण मुल्यमापन करण्याची वेळ येते तर आपणं त्या ठिकाणी संकुचित भुमिका घेऊन आपलं खोटं खोटं श्रेष्ठत्व अबाधित राखण्यासाठी वेगवेगळी ताकलादु बंधनं निर्माण करतो . मुळात निसर्गाने जीवन हे सगळ्यांना सारखंच दिलं आहे. मग हा वरकरणी भेद का व कशासाठी , निसर्गाची धर्माची, संस्कारांची काही बंधनं असतात ती असली पाहिजेत आणि पाळली पण गेली पाहिजेत या विषयी एकंदरीत स्त्री समुहाच काही दुमत नाही. हि बंधनं पाळताना मात्र नैसर्गिक न्याय जोपासला गेला पाहिजे. कोणतीही गोष्ट एकट्याने खाण्यापेक्षा वाटुन खाल्ली तर आनंद द्विगुणित होतो . पण मोठेपणा सन्मान हा फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे असं भासवत स्वतःलाच मिळाला पाहिजे अशी वृत्ती नसली पाहिजे .आणि मुळात असं न करता आपल्या सोबत असणार्या स्त्रिला पण तो मान सन्मान मोठेपणा आपल्या बरोबरीने मिळाला पाहिजे.तील सुद्धा तीच जीवन संस्कारांच्या चौकटीत राहून मुक्तपणे जगता आलं पाहिजे.जगद जननी जगाची अधिष्ठात्री जन्मदाती स्त्रि हि आदी शक्ति आहे .याचा विसर न पडणं म्हणजे पुरुषार्थ.आपल्या सोबत किंवा सहवासात असणार्या व्यक्तिला कधीचं दुय्यम न समजणं किंवा तशी जाणीव न होऊ देणं हेच व्यक्ती मधील पुरुषार्थच मुख्य लक्षण आहे. विश्वाची रचना होत असताना सृष्टीच निर्माण योग्य पद्धतीने होण्यासाठी निसर्गाने जी रचना निर्माण केली आहे .त्या रचनेतील जीव सृष्टीतील मुख्य पात्र म्हणजे नर मादा किंवा स्त्रि पुरूष हे एक नाण्याच्या दोन बाजू असल्याने समांतर महत्व आहे .हे कोणीही नाकारू शकत नाही.पण हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता आजुन तरी पुरुष प्रधान संस्कृतीची झाली नाही. सध्या तरी ज्ञ पुरुष प्रधान मानसिकतेच हे अपयश आहे असंच म्हणावं लागेल. तसं पाहिलं तर युग कोणतही असेल सृष्टी वर जेव्हा जेव्हा संकटं आल तेव्हा तेव्हा आदी शक्तीने प्रकट होऊन संकटाच निवारण केल.मुळात स्त्री हि आदी शक्ती आहे आणि सामाजिक पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवर आपण जेव्हा वास्तविक विचार करतो तेव्हा आपण मोठ्या मनाने हि गोष्ट मान्य केली पाहिजे कि नारी हि दुय्यम नाही.महणुन तीला मुक्तपणे जगता आलं पाहिजे.सगळयात महत्वाचं मुक्तपणे श्वास घेता येण गरजेच आहे. आणि मुक्त श्वास घेणं म्हणजे नारीला आपण दुय्यम आहेत याची जाणीव न होऊ देणं . एका नाण्याला दोन बाजू असतात आणि या दोन्ही बाजू समान असतात कोणीतीही एक बाजु दुबळी कमकुवत नसते.किंवा कोणतीही एका बाजु प्रभावी नसते . दोन्ही बाजुचे समान मुल्य असते आणि तेव्हा ते नाणं खणखणीत आणि दणदणीत असतं. सृष्टी वर जो काही मानवी समुह आहे . त्या मध्ये स्त्री आणि पुरुष हे जरी दिसण्यासाठी भिन्न असले तरी मुल्य हे समान आहे स्त्रि शिवाय पुरुष पुर्ण नाही .आणि पुरूषाशिवाय स्त्री पुर्ण नाही. आध्यत्मिक पातळीवर तर स्त्रि च महत्व आदिशक्ती म्हणून आहे .आणि तरी सुद्धा सामाजिक पातळीवर आपण स्त्रीला आजही काही प्रमाणात दुय्यम समजतो. हे दुर्भाग्य आहे. मुळात स्त्रीला मुक्तपणे श्वास घेता आला पाहिजे.आणि हेच स्वातंत्र्य म्हणजे खरं स्वतंत्र आहे .समाज म्हणून वावरत असताना प्रत्येकजण एक व्यक्तिमत्त्व आहे मग ते स्त्रि असेल किंवा पुरुष असेल आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाचा एक स्वतःच विश्व असतं हेच विश्व मुक्तसंचार पणे निर्माण करता आलं पाहिजे जगात आलं पाहिजे अनुभवता आलं पाहिजे.आणि आपलं विश्व निर्माण करताना आपला धर्म संस्कार संस्कृती याच मुल्य मात्र अबाधित रहिल पाहिजे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301