टाकळीभान येथे गतीरोधक बसविण्याची मागणी.
टाकळीभान येथे गतीरोधक बसविण्याची मागणी.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील डाॅ. लोखंडे यांचे दवाखान्या समोर नेवासा—श्रीरामपूर राज्यमार्गावर व गणेश भेळ सेंटर समोर श्रीरामपूर नेवासा राज्य मार्गावर गतीरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
येथील स्टॅन्ड परिसरात काही ठिकाणी गतीरोधक बसविण्यात आलेले आहेत मात्र दुभाजकाच्या पुर्व—पश्चिम या दोन्ही दिशेला गतीरोधक बसविण्यात आलेले नाही त्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे
श्रीरामपूर तालुक्यातील मोठी लोकसंख्या व बाजारपेठ असलेले टाकळीभान हे गाव असून आसपासच्या अनेक गावातील लोकांचा संपर्क येथे रोज असतो. या गावामधूनच श्रीरामपूर—नेवासा राज्यमार्ग जात असून या राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये—जा सुरू असते. गेल्या काही दिवसापासून या मार्गाचे रूंदीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरू असून काही ठिकाणी ते पुर्ण झाले आहे. टाकळीभान स्टॅन्ड परिसरात गणेश भेळ सेंटर ते उंडे अॅग्रो पर्यंत या ठिकाणी दुभाजक बसविण्यात आलेले आहे. या ठिकाणी एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडवा लागतो. मात्र नेवासाकडून तसेच श्रीरामपूरकडून सुसाट वेगाने येणार्या वाहनामुळे रस्ता ओलांडणार्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. बहुतांश अपघात या ठिकाणी घडले आहे. या राज्यमार्गाचे काम झाले असल्याने वाहनांची गती वाढली आहे. गावाजवळ वाहने येत असतानाही गती कमी होत नाही. परिणामी अपघात वाढले आहे.
या होत असलेल्या अपघाताची मालीका थांबविण्यासाठी तसेच गाव हद्दीत येताच वाहनांची गती कमी होण्यासाठी नेवासाकडील बाजूस तसेच दुभाजकाच्या पुढे व श्रीरामपूर कडील बाजूसही दुभाजकाच्या पुढे गतीरोधक बसविण्यात यावे. अशी मागणी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे नागरिकांनी केली आहे