हरवलेले बाळ पोलीस, पत्रकार व दक्ष नागरीकामुळे काही तासातच सुखरुप आजी आजोबाकडे
हरवलेले बाळ पोलीस, पत्रकार व दक्ष नागरीकामुळे काही तासातच सुखरुप आजी आजोबाकडे
प्रवरा नदीच्या पुलाजवळ असलेल्या दशक्रिया विधी घाटाजवळ सापडलेले लहान बाळ पोलीस, पत्रकार व संदेश वहन यंत्रणेमुळे काही तासातच आजी आजोबांच्या स्वाधीन करण्यात यश मिळाले बेलापुर येथील दशक्रिया विधीच्या घाटावर असणाऱ्या बाकावर एक लहान बाळ झोपलेले होते एका महीलेने त्या मुलाला तेथे ठेवल्याचे तेथे राहाणाऱ्या लिलाबई सकट ,कावेरी सचिन पुजारी ,लता नंदु पुजारी यांनी पाहीले. ती महीला परत येईल असे त्यांना वाटले.
बराच वेळ झाला परंतु ती महीला परत आली नाही. लिला़बाई सकट ,कावेरी सचिन पुजारी लता नंदु पुजारी यांनी त्या बाळावर लक्ष ठेवले झोपलेले बाळ जागी झाले व ते हालचाल करु लागले. ते बाकड्यावरुन खाली पडेल हे लक्षात येताच या तीघीही त्या बाकड्याकडे पळाल्या व बाकड्यावरुन पडणाऱ्या बालकास अलगद पकडले, मुलाची आई बराच वेळ झाला तरी येत नाही हे पाहुन कावेरी पुजारी यांनी पती सचिन पुजारी यांना फोन करुन सदर घटना सांगितले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांशी संपर्क साधला.दिनेश सकट ,संतोष सकट व पोलीस काँन्स्टेबल नंदु लोखंडे तातडीने दशक्रिया विधीच्या ठिकाणी गेले ,त्या मुलाला ताब्यात घेवुन त्यांनी पत्रकार देविदास देसाई यांनी फोन करुन माहीती दिली देसाई यांनी सर्व व्हाँट्सअप गृपवर बाळाचे फोटोव माहीती टाकली तसेच बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तातडीच्या संदेश वहन यंत्रणेद्वारे संदेश प्रसारीत केला.
अन काही वेळातच बाळाचे आजोबा त्या ठिकाणी आले आजोबाला पहाताच बाळ त्यांच्या दिशेने झेपावले, बाळाचे आजी आजोबा काही वेळातच मिळाल्यामुळे पोलीसांनाही हायसे वाटले ते बाळ आजोबा मच्छिंद्र कारभारी बडधे ,आजी तुळसाबाई बडधे आई ऋषाली शरद बडधे यांच्या ताब्यात देण्यात आले,व्हाँट्सअप गृप व तातडीच्या संदेश वहन यंत्रणेमुळे काही तासातच बाळ सुखरुप घरी पोहोचले.