कुकडीचे आवर्तन पिण्यासाठी सुटले..राजेंद्र नागवडे यांच्या प्रयत्नांना यश…
कुकडीचे आवर्तन पिण्यासाठी सुटले..राजेंद्र नागवडे यांच्या प्रयत्नांना यश…
श्रीगोंदा तालुक्यातील पिके पाण्याअभावी जळून चालली होती.बहुतेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. हीच समस्या जाणून नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील पाण्याची टंचाई दूर करणेकरीता शनिवार पासुन पिण्याकरीता पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती सहकार महर्षी
शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली.
मागील आवर्तनातील विस्कळीतपणामुळे श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी डाव्या कालव्याच्या
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळाले नव्हते. त्यामुळे मागील १०-१५ दिवसांपासुन या
भागात पाण्याची टंचाई जाणवु लागली होती. त्यामुळे जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव
पाटीलसाहेब व जलसंपदा विभागाचे संबंधीत अधिकारी यांना समक्ष भेटून व वस्तुस्थितीचे
गांभीर्य पटवून देवून लोकांची व जनावरांची पिण्याचे पाण्याची गैरसोय दूर करणेकरीता पाणी
सोडण्याची विनंती केली. जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटीलसाहेब व संबंधीत अधिकारी यांनी
सदरची विनंती मान्य करुन शनिवार ता. ११ जून पासुन कुकडी डाव्या कालव्यातुन पिण्याकरीता पाणी सोडण्यात येणार असल्याचे राजेद्र नागवडे यांनी सांगितले. अडचणीचे काळात मिळणाऱ्या
पाण्याचा कुठेही अपव्यय होणार नाही याची दक्षता घेवून पाण्याचा योग्य वापर करावा असे
आवाहन नागवडे यांनी केले आहे.