राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा 23 वा वर्धापन दिन श्रीगोंदा येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा 23 वा वर्धापन दिन श्रीगोंदा येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा काल 23 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात राज्यात साजरा करण्यात आला.देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी 1999 मध्ये या राजकिय पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रातील या प्रमुख पक्षाने काल 23 व्या वर्षात पदार्पण केले आहे. हा पक्ष अनेक वर्ष राज्यात आणि देशात सत्तेत सहभागी सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र राज्यात दबदबा वाढला आहे..
सर्व प्रश्नाची जान असणारे आणि प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडणारे देशाचे नेते म्हणजे आदरणीय मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. त्यामुळे विचारांची पक्की बैठक असणार्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत आहोत. महाराष्ट्र नेहमीच पवार साहेबांच्या व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात देखील प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने पक्ष विस्तारासाठी तसेच मान.खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, खा. सुप्रियाताई सुळे, मा. ना. जयंतरावजी पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सर्व सामान्य नागरीकापर्यंत पोहचवावे. असे आवाहन माजी.आमदार तथा जिल्हा बँक संचालक राहुलदादा जगताप यांनी श्रीगोंदा येथे केले.
यावेळी जेष्ठ नेते आदरणीय बाबासाहेब भोस, आदरणीय घनश्याम आण्णा शेलार, तालुकाध्यक्ष हरीदास आबा शिर्के , महिला तालुकाध्यक्ष सौ. मिनलताई भिंताडे, युवक अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, बाळासाहेब उगले, सुभाषशेठ राक्षे,आबासाहेब शिंदे, राजाभाऊ लोखंडे, निसारभई बेपारी, प्रशांत गोरे, संतोष कोथींबीरे, ह्रदय घोडके, गणेश भोस, आक्तरभाई शेख, बाळासाहेब शेलार, विठ्ठलराव काकडे, भगवानराव गोरखे, विजयदादा कापसे, रमेश बापू कलमकर, फ़क्कडबापु मोटे, बापुराव सिदनकर, पांडूरंग पोटे, शांताराम पोटे, सोनू कोथिंबीरे, रूपेश काळेवाघ, आबासाहेब झरे, तुळशीराम जगताप, शरद शेळके, अविनाश जठार, तान्हाजी बोरूडे, सुखदेव अप्पा तीखोले, दादासाहेब औटी, गंगाराम मचे, जगन्नाथ औटी, मुकुंद सोनटक्के, शाम झरे विजय कानगुडे, अजित जामदार, नाना पाचपुते, मिलिंद भोयटे, विजय शेंडे, पप्पू वागसकर, मास्टर चव्हाण, आप्पा शेंडे, विलास रसाळ, इरफान पिरजादे, विजय खेतमाळीस, सागर बोरुडे, विकास बोरुडे, मंगेश सुर्यवंशी, किरण मखरे, दैवत जाधव, दत्ता शिर्के, तुषार नवले, निलेश बारगळ, बालु मखरे, शरद गलांडे, भोजराज मोटे, पंकज अनभुले, आप्पा रोडे, संजय शेळके, मंगेश मोटे, आकाश भोसले, अमित शेटे, बिभीषन निंभोरे, बिभीषन जाधव, रविंद्र औटी, नीलेश कुरूमकर, तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी कोळगाव येथील एका कार्यक्रमात राहुल जगताप यांना आमदार होण्यासाठी पाठिंबा दिला होता त्यातच श्रीगोंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाला भोस यांनी हजेरी लावल्याने नागवडे समर्थकांच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.भोस यांना राजेंद्र नागवडे यांनी नागवडे कारखान्यात व्हाईस चेअरमन पदी विराजमान केले खरे पण भोस हे माजी आमदार राहुल जगताप यांच्याच गटाचे आहेत काय अशी चर्चा तालुक्यात होत आहे.