ब्रेकिंग

भाजपच्या नावाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा नकली हिंदुत्ववादी नेता म्हणून समाजामध्ये वावरणारा

भाजपच्या नावाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा नकली हिंदुत्ववादी नेता म्हणून समाजामध्ये वावरणारा

 

 

*श्रीरामपूर (प्रतिनिधी):- मुस्लिम जिहाद्यांना जवळ करत त्यांच्याशी मोठ्या आर्थिक तोडपाण्या करणारा व भाजपच्या ध्येय धोरणा विरोधात कृत्य केले म्हणून पक्षाने हकालपट्टी केलेला व भाजपच्या नावाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा नकली हिंदुत्ववादी नेता म्हणून समाजामध्ये वावरणारा भाजपाची प्रतिमा मलीन करत मागासवर्गीय बलात्कार पीडित मुलीला आरोपी मुल्ला कटरच्या विरोधात साक्ष देऊ नये म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून धमकावणाऱ्या फरार प्रकाश चित्तेला दोन दिवसात अटक करा व मुल्ला कटर व त्याच्या साथीदारांवर मोका अंतर्गत झालेल्या कारवाईत फरार आरोपी चित्तेला देखील सहआरोपी करा तसेच पीडित मुलीशी आरोपीचे झालेले कॉल डिटेल तपासा व या घटनेत पीडित मुलीच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन अप्रत्यक्ष रित्या सहभाग घेणाऱ्या वकीला वर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू त्यामुळे होणाऱ्या परिणामांना पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन अपर पोलीस अधीक्षक यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले.*

 

      भाजपचे अहिल्यानगरचे उत्तर विभागाचे जिल्हा सचिव दत्ताभाऊ खेमनर यांच्यासह असंख्य सकल हिंदू समाजातील प्रमुख कार्यकर्ते व महिलांच्या उपस्थितीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे हे नगर येथे बैठकीसाठी गेल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे यांनी मागणीचे निवेदन स्वीकारले.

 

                याप्रसंगी उपास्थित पत्रकारांशी बोलताना खेमनर म्हणाले कि,राज्यभर गाजलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला पळवून नेवून तिचे धर्मांतर करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करून सोळाव्या वर्षी मुलीवर तिच्या इच्छेखातर मातृत्व लादलेल्या मुल्ला कटर प्रकरणामुळे भल्या भल्यांची मती गुंग झाली होती.स्थानिक हुंदुत्ववादी संघटनानी या गंभीर प्रकरणात लक्ष घालून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत शासनाचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते.विधानसभेत देखील या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली ते प्रकरण दाबून मुल्ला कटर ला मदत करणाऱ्या पोलीस निरीक्षक सानप व पोलीस कॉस्टेबल पंकज गोसावी यांना निलंबीत करण्यात आले आहे.मुल्ला कटर प्रकरण संपूर्ण राज्यभर एक चर्चेचा विषय होऊन बसलेले होते.याच प्रकरणामुळे शासनाने लावजिहाद विरोधात कडक कायदा करण्याचे पहिले पाऊल उचलेले आहे. असे असतांना भाजपचा स्वयंघोषित नेता म्हणवून घेणाऱ्या प्रकाश चित्ते याने मुल्ला कटर व त्याच्या साथीदारांना नेहमी क्लिनचिट देण्याचा व त्यांना मदत करण्याचे घृणास्पद कृत्य केलेले आहे.

 

खेमनर पुढे म्हणाले की,आरोपी व पीडित मुलीशी झालेले कॉल डिटेल तपासून मुलीच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्या वकिलावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. 

 

           आपल्या भाषणात भैय्या भिसे म्हणाले कि, भाजपने हकालपट्टी केलेल्या नराधम फरार आरोपी प्रकाश चित्ते मुळे भाजपाची प्रतिमा जिल्ह्यात मलीन झाली आहे.राज्यात गाजलेल्या या प्रकरणामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटना आरोपी मुल्ला कटर व त्याच्या साथीदारांना अटक करून कडक शासनाची मागणी करत असतांना हाच स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेता प्रकाश उद्दीन चित्ते त्यांना क्लीन चिट कसे मिळेल याच्या प्रतीक्षेत होता. चित्तेवर अटक करून कठोरातील कठोर कारवाई करावी जेणेकरून त्याने भाजपाच्या नावाचा गैरवापर पुन्हा कधीच केला नाही पाहीजे. 

 

          या प्रसंगी सकल हिंदू समाजाच्या महिलांनी देखील आपला राग व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून दिली व फरार आरोपी प्रकाश चित्ते याला दोन दिवसात अटक नाही केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे.

 

        यावेळी संघर्ष दिघे, सुनील पाचोणे,चेतन भाऊ गायकवाड,यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे