ब्रेकिंग

समाधी मंदिरातील भाविकांनी दान केलेल्या रकमेची चोरी कर्मचाऱ्याला अटक

समाधी मंदिरातील भाविकांनी दान केलेल्या रकमेची चोरी कर्मचाऱ्याला अटक

 

प्रतिनिधी आफ्रीन आरिफ शेख आळंदी

संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. पवित्र अधिक महिना सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात दान माऊलींच्या दारात भाविक अर्पण करत आहेत मात्र अशा पवित्र महिन्यामध्ये माऊलींच्या दानपेटीतील रक्कम चोरण्याचा श्रद्धेला काळिंबा फासण्याचा प्रकार आरोपी विशाल बाळ वारुळे वैद्यतील याने केलेला आहे

याबाबत सविस्तर हकीकत अशी की विशाल बाळ वारुळे हा माऊलींच्या मंदिरामध्ये सेवक पदावर रुजू होता. दररोज दानपेटीत जमा झालेली रक्कम ही कॅशियर कडे जमा करण्याच्या अनुषंगाने काढली जाते यावेळी संधीचा फायदा घेत आरोपी नामे विशाल वारुळे यांनी दिनांक बारा मे तेरा मे आणि 16 मे रोजी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या सुमारास कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने चालाकिने दानपेटीतील रक्कम काढताना नजर चुकून पैसे पोत्यामध्ये भरल्याचा आरोप आहे त्यानंतर आरोपी विशाल वारुळे हा त्या पोत्यांवर प्लास्टिकचे ट्रे ठेवत आहे आणि कॅशियर महेश गोपाळ गोखले यांच्याकडे दानपेटीतील रक्कम जमा करायला जात असताना मोठ्या शिताफीने प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे या आरोपीने सुमारे 15000 रुपये दानपेटीची रक्कम लांबवल्याचे निदर्शनात आले आहे याबाबत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिले आहे पोलिसांनी सदर फिर्यादीची तात्काळ दखल घेत आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम 306 अन्वये गुन्हा नोंदवत अटक केलेली आहे सदर आरोपी हा कॅशियर रूम मध्ये रक्कम जमा करण्यासाठी जात असताना चोरलेली रक्कम कपाटाच्या मागे लपवत असे आणि त्या रकमेवर फुलांचे हार टाकून जाताना हार घेऊन जात आहे असा भास निर्माण होईल अशी शिताफी करत तेथून पसार होत असे. याबाबत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने गंभीर दखल घेतली असून पोलिसांना याबाबत कठोर पावले उचलावी असे कळवले आहे. दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आरोपी आळंदी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत मात्र अधिकमासाच्या या पवित्र महिन्यामध्ये अशी अपप्रवृत्ती करण्याची बुद्धी माऊलींची सेवा करून येतेच कशी याबाबत खूप खंत वाटते असे नागरिक चर्चा करत आहेत

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे