सण – उत्सव,यात्रा दरम्यान राहुरी शहरात तसेच गावोगावी वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे तसेच स्वागताचे, शुभेच्छांचे फलक लावण्यात आलेले आहेत जे अद्याप पावतो काढण्यात आलेले नाहीत तात्काळ काढून घेण्यात यावेत. – मेघशाम डांगे
सण – उत्सव,यात्रा दरम्यान राहुरी शहरात तसेच गावोगावी वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे तसेच स्वागताचे, शुभेच्छांचे फलक लावण्यात आलेले आहेत जे अद्याप पावतो काढण्यात आलेले नाहीत तात्काळ काढून घेण्यात यावेत. – मेघशाम डांगे
सण – उत्सव,यात्रा दरम्यान राहुरी शहरात तसेच गावोगावी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे तसेच स्वागताचे, शुभेच्छांचे फलक लावण्यात आलेले आहेत जे अद्याप पावतो काढण्यात आलेले नाहीत.अशा आयोजकांनी नमूद झेंडे तसेच बोर्ड तात्काळ काढून घ्यावेत असे आवाहन राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी केले आहे.
त्यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, मागील गेल्या काही दिवसापासून सर्व धर्मीयांचे अनेक सण- उत्सव, यात्रा मोठ्या उत्साहात आपल्या सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार पडले आहेत त्याबद्दल त्यांनी सर्व धर्मियांचे आभार मानले आहे. तसेच सण – उत्सव,यात्रा दरम्यान राहुरी शहरात तसेच गावोगावी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे तसेच स्वागताचे/शुभेच्छांचे फलक लावण्यात आलेले आहेत जे अद्याप पावतो काढण्यात आलेले नाहीत.
सदर फलक फाटल्यामुळे, झेंडे पडल्यामुळे आपापसात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, काही ठिकाणी या कारणामुळे वादविवाद देखील झालेले आहेत. अनेकांनी सदर फलक/झेंडे लावण्याची संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा विभागाकडून परवानगी देखील घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित फलक/ झेंडे लावणारे आयोजकांनी नमूद झेंडे तसेच बोर्ड तात्काळ काढून घ्यावेत जेणेकरून भविष्यात त्या कारणावरून वाद होणार नाही.
लवकरच लग्नसराई सुरू होणार असून कोणीही रात्री दहा वाजे नंतर वाद्य सुरू ठेवू नये तसेच डीजेचा वापर करू नये. सर्व मंगल कार्यालय चालक/मालक तसेच डीजे चालक यांनी देखील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांनी देखील त्यासाठी सहकार्य करून आपल्या शुभकार्यास गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी ही विनंती.राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी केले आहे.