समाज कल्याण आयुक्त देवढे यांची जिल्हा परिषद केंद्र, शाळा टाकळीभानला अचानक भेट,

समाज कल्याण आयुक्त देवढे यांची जिल्हा परिषद केंद्र, शाळा टाकळीभानला अचानक भेट,
नुकतेच समाज कल्याण आयुक्त देवढे यांनी जि. प. केंद्र टाकळीभान शाळेस अचानक भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील उपक्रमाची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांना ‘लम्पी’ आजाराविषयी माहिती दिली. लम्पी आजाराची माहिती विद्यार्थ्यामार्फत पालकापर्यंत जाईल हि अपेक्षा होती. तसेच त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे वाचन घेतले. विद्यार्थ्याचे वाचन, विद्यार्थ्यांचा चूणचुणीतपणा बघून त्यांनी समाधान व्यक्त केले.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे त्यांनी सांगीतले. शाळेत चालू असलेले रंगकाम, चित्रकाम एकंदरीत शाळेय स्वच्छ व सुंदर वातावरण त्यांना चांगल्या प्रकारे भावले, एक दिवस शाळेसाठी था उपक्रमाअंतर्गत पुन्हा शाळेला भेट देईल असेही त्यांनी सांगितले,
याप्रसंगी त्यांच्या समवेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परदेशी , ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, तसेच इतर सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कोकणे, सदस्य, तसेच ग्रामविकास अधिकारी जाधव , पशुवैदयकिय डॉक्टर कोकणे इतर ग्रामस्थ तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिल कडू सर व शिक्षकवृंद उपस्थित होते.