आळंदीत बत्ती गुल ? महाराष्ट्र राज्य वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम दिसायला सुरुवात*
*आळंदीत बत्ती गुल ? महाराष्ट्र राज्य वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम दिसायला सुरुवात*
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व वीज कर्मचारी संपावर आहेत. दिनांक चार पाच आणि सहा असा हा संप आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत असून, पुण्यातील बहुतांश भागांमध्ये बत्ती गुल आहे. येरवडा डेक्कन कॉलेज परिसरामध्ये रात्री दोन वाजता बत्ती गुल झाली आहे. तसेच शहरातील मध्यमवर्ती भागामध्ये वीजपुरवठा खंडित आहे.तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे सध्या कुठल्याही प्रकारची वीज खंडित नसली तरी. धानोरे येथील वीज गेल्याचे समजते. धानोरे या ग्रामीण भागातील वीज खंडित झालेली आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सर्व वीज कर्मचारी संघटना यांच्याशी आज बैठक घेणार आहेत.
त्या वर संप तोडगा निघण्याची शक्यता आहे. परंतु तोडगा जर नाही निघाला तर, मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हॉस्पिटलला असलेल्या महत्त्वाच्या ऑपरेशन या विद्युत स्रोतवर अवलंबून असतात. बऱ्याचशा हॉस्पिटलच्या ठिकाणी अत्यावश्यक रुग्ण यांना याचा त्रास होऊ शकतो.बरेचसे ऑपरेशन हे पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. त्याचबरोबर संचित असलेले युनिट जोपर्यंत आहे, तोपर्यंत वीज पुरवठा राहील.
नंतर मात्र हळूहळू बराच परिसर अंधारात लोटला जाण्याची शक्यता आहे.आदानी कंपनीने मागितलेल्या समांतर परवानगी ला वीज कर्मचारी, वीज संघटनांचा विरोध असून, महावितरण, महा रोशन, महाविद्युत, या तिन्ही विभागांचा तीव्र स्वरूपात विरोध दिसून येत आहे,खाजगीकरण झाल्यास याचा मोठा परिणाम ग्राहकांनाही सोसावा लागेल. त्यासाठी ग्राहकांनीही तसेच सामान्य जनतेने ही रस्त्यावर उतरावे अशी अपेक्षा कर्मचारी करत आहेत. मात्र सामान्य नागरिक यापासून अनभिज्ञज्ञ असून त्यांना पुढील धोका हा ओळखू येत नाही.
असे दिसते, जर खाजगीकरण झाले तर भविष्यात वीज बिल दरवाढ, ही परवडणारी असणार नाही. सामान्यांना त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होईल. हा धोका समोर असतानाही नागरिक मात्र त्यापासून अनभिज्ञ आहेत.