अखेर अहिल्यानगर झालेच.

अखेर अहिल्यानगर झालेच.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुढाकार घेत अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यात यावे अशी मागणी केली होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या या जिल्ह्यात जन्म झाला ज्यांनी संपूर्ण देशात राज्य करत एक सर्व धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार केलेला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर झाल्याने आता खरे स्वरूप आल्याचे जनतेत वाच्यता होत असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यानंतर राज्य शासनाने केंद्र शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता. गेल्या महिन्यात रेल्वे मंत्रालयाने नामांतरणास हरकत नसल्याचे कळवल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाने राज्य शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक वेळा मागणी केली होती सर्वांच्या मागणीला यश आल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
महसूल मंत्री विखे पाटील यांनी महायुती सरकारने शब्द दिला होता त्या शब्दाची वचनपूर्ती केल्याची ट्विट केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.