सोसायटी थकबाकीदार सदस्य अपात्र करा बबन आल्हाट यांची मागणी

सोसायटी थकबाकीदार सदस्य अपात्र करा बबन आल्हाट यांची मागणी
नेवासा तालुक्यातील रांजणगाव सोसायटीतील तेरा पैकी नऊ सदस्य थकबाकीदार आहे. शासन नियमाप्रमाणे थकबाकी असणाऱ्या सदस्यांना पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार उरत नाही. त्यामुळे रांजणगावातील सर्व थकबाकीदार सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी सत्यशोधक बहुजन चळवळीचे जिल्हा संघटक व विद्यमान सोसायटी सदस्य श्री बबन पंडीत आल्हाट यांनी नेवासा तालुका दुय्यम निबंधक कार्यालय यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. बबन पंडित अल्हाट यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की रांजणगाव सोसायटीत गेल्या दोन वर्षापासून अनागोंदी कारभार सुरू आहे दोन वर्षात कुठल्याही प्रकारची सर्वसाधारण एकही मीटिंग सुद्धा बोलवलेली नाही .शिवाय काम करताना कोणालाही विचारात घेऊन निर्णय घेतले जात नव्हते ठराविक लोकच मक्तेदारी असल्याप्रमाणे या ठिकाणी सोसायटीचा कारभार पाहत होते त्यामुळे बाकीचे सदस्य फक्त नावालाच का ? असा सवाल अनेक जण करत होते. या सर्वची गोष्टीची दखल घेऊन मी वरिष्ठाकडे तक्रार केल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 30 6 2024 अखेर नऊ सदस्य थकबाकी त गेले असल्याने त्यांना त्वरित अपात्र ठरवण्याचे गरजेचे असताना देखील तीन महिने उलटून देखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तरी वरिष्ठांनी या सर्व गोष्टीची चौकशी करून थकित सदस्यावर त्वरित कारवाई करून त्यांचे पद रद्द करावे व सोसायटीचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.