तिळापुर,कोपरे, वांजुळपोई मांजरी व परिसरात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.
तिळापुर,कोपरे, वांजुळपोई मांजरी व परिसरात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.
परतीचा पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे कपाशी पिकाचे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे झाले आहे. चालू वर्षी पाऊस पिकासाठी उपयुक्त झाल्याने मागील वर्षाची कमी पावसाची कमी भरून निघणार या आशेने शेतकऱ्यांची आशा पल्लवीत झाली होती. पिके ऐन काढणीच्या वेळेला परतीचा पाऊस जोर धरून राहिल्याने कपाशी पिकाचे नुकसान झालेले आहे. या पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्यात यावे यासाठी मागणी जोर धरत असतानाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांच्याकडून 32 गावात सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळी सणासुदीच्या काळात मदतीचा आधार देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ई पीक पाहणी करून शेतकऱ्यांनी एक रुपया मध्ये विमे उतरवलेले असताना नुकसान झाल्यानंतर कंपनीशी टोल फ्री नंबर वर संपर्क करून देखील कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पिकावर ती पहाणी करण्यासाठी येण्यासाठी टाळाटाळ करत आहे. यावर शासकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी तसेच तहसील विभागाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी देखील मागणी होत आहे.
यावेळी रामकृष्ण जगताप, साहेबराव जगताप, सोपान होडगर, विशाल जाधव, सुधाकर जगताप, नानासाहेब जाधव, बजरंग पवार, अमोल होन, लखन जगताप, तुषार जगताप, भगीरथ जाधव विलास सैदोरे, तुषार जगताप, दीपक जगताप, भाऊसाहेब जगताप, भरत जगताप, भगिरथ जगताप, विठ्ठल जगताप, वृषीकेश जगताप, हीरालाल जाधव, बाळासाहेब जाधव, सुधाकर जाधव, आप्पसो पवार, बजरंग पवार आमोल होन आदी आदी शेतकरी उपस्थित होते