ब्रेकिंग

सरपंच महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत जंगलात आढळून आला..

महिलेचा मृतदेह जंगलात अर्धनग्न अवस्थेत..

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात एक भयानक घटना घडली आहे. येथील एका गावातील महिला सरपंचाचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. तुडील भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी येथे हा मृतदेह आढळून आला आहे. सदरील महिला ही सोमवारी दुपारच्या सुमारास जंगलात सरपन आणण्यासाठी गेली असता ही घटना घडली आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गावातील एक तरुण महाडकडे येत असताना त्याला रस्त्यालगत सरपानाचा भारा पाहिला. मात्र या भारीजवळ त्याला कुणीही दिसले नाही. म्हणून सदरील तरुणाने परिसरात बघले असता रस्त्यालगत जंगलाच्या भागात सदर महिला मृतावस्थेत दिसून आला.

 

 

 

सदरील महिला ही महाड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची सरपंच होती. या महिलेवर हत्येपूर्वी बलात्कार किंवा अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र असे असले तरीही पोलिसांनी याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सदरील महिलेच्या डोक्यात अज्ञात इसमाने फाटा मारून तिचा खून केला असल्याचा संशय आहे.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महाडचे पोलीस अधिक्षक, तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आपल्याच गावातील महिला सरपंचाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गावपरिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महाडचे पोलीस अधिक्षक, तालुका पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आपल्याच गावातील महिला सरपंचाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गावपरिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

या प्रकरणी स्थानिक पोलीस विविध अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने बलात्कार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. त्या अँगलनेही पोलीस आपला तपास करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बलात्कार झाला की नाही हे स्पष्ट होईल.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे