सागर बेग यांच्या मागे स्वयंस्फूर्तीने मतदार उभे. बाकीच्या उमेदवारांना फुटलाय घाम.

सागर बेग यांच्या मागे स्वयंस्फूर्तीने मतदार उभे. बाकीच्या उमेदवारांना फुटलाय घाम.
श्रीरामपूर(प्रतिनिधी):- मी माझ्या भाषणात हिंदू धर्म वाचवण्यासाठी जे सत्य आपल्या समोर मांडतोय ते विरोधकांना त्यांच्या भरसभेत बोलायला लावा ते बोलले तर मतदान त्यांना करा पण त्यांच्यात बोलायची हिंमत नसेल तर त्यांना हाकलून द्या.
*आजपर्यंत गांधींच्या नावावर मते मागणारेच आले पण नथुराम गोडसेंच्या नावावर मते मागणारा कोणी पैदा झालेला नाही असे प्रखर मत अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी मांडले.*
टाकळीमिया गावातून शेकडो युवकांची मोटार सायकल रॅली सागर बेग यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली त्यांनतर ती रॅली तशीच पुढे मांजरी गावात झालेल्या जंगी प्रचार सभेच्या ठिकाणी नेण्यात आली.यावेळी झालेल्या भरगच्च प्रचार सभेत मतदारांना उद्देशून सागर बेग हे बोलत होते.गावातील विरोधकांच्या सभा वीस पंचवीस मतदारांच्याच उपस्थितीत झाल्या त्यापैकी अनेक जण उमेदवारांच्याच गाडीतून सभेला आणले जातात पण अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या सभेला स्वयंस्फूर्तीने होत असलेली गर्दी मतदारसंघाचे राजकीय गणिते बदलवणारी ठरणार आहे.
भरगच्च सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सागर बेग पुढे म्हणाले की,ज्या छत्रपतींमुळे त्यांच्याच राज्यात आज आपण सुखाचा घास खातोय त्याच आमच्या दैवताची विटंबना करण्याची हिम्मत जीहादी करत असतील तर महाराष्ट्र शासनाने त्याबाबत कडक कायदे केले पाहिजे त्याशिवाय हे हिंदूंना डिवचण्याचे प्रकार थांबणार नाहीत असा संताप व्यक्त करून ते पुढे म्हणाले की,गोमातेला राज्य शासनाने राज्य मातेचा दर्जा दिला पण तिची हत्या करणाऱ्यांना मोकळे सोडले गोहत्या करणाऱ्यांना देखील कडक शासन व्हावे यासाठी कायदे होणे गरजेचे आहे.त्याशिवाय गोहत्या बंदी कायद्याला बळकटी येणार नाही.
सभेचे नियोजन मांजरी पंचक्रोशीतील मतदारांनी स्वयंस्फूर्तीने केले होते.सभेच्या ठिकाणी आगमन होताच अतिष बाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले.पुण्यश्लोक अहिल्यामातांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार घातला सभेच्या ठिकाणी वाजत गाजत महिलांच्या हस्ते औक्षण करत सागर बेग यांना नेण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मांजरी गावातील असंख्य युवक ग्रामस्थांनी अखेरपर्यंत कष्ट केले.