ग्रामपंचायत कार्यालय शेजारील अनाधिकृत बांधकाम पाडणे बाबत… सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे निवेदन…

ग्रामपंचायत कार्यालय शेजारील अनाधिकृत बांधकाम पाडणे बाबत… सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे निवेदन…
टाकळीभान प्रतिनिधी: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालय शेजारी अनाधिकृत इमारतिचे बांधकाम झाले असून ती इमारत ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी खेटून झालेली असल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या खिडक्या झाकल्या असून ग्रामपंचायत कार्यालय मध्ये पुरेशी हवा व प्रकाश येत नाही, अशी तक्रार टाकळीभानच्या सरपंच व सात सदस्यांनी केली आहे, व त्या अनाधिकृत बांधकाम वर कारवाई व्हावी या आशयाचे निवेदन विविध शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे, त्याच्याप्रती तहसीलदार, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी ठिकाणी देण्यात आल्या आहेत. तरी या बांधकामावर त्वरित कारवाई करून बांधकाम पाडण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच या सदर अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस देखील ग्रामपंचायतने दिली असून या अनधिकृत बांधकामाचा पंचनामा देखील सर्कल तलाठी यांनी केला आहे. तरी या बांधकामावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सरपंच व सदस्य यांनी दिला आहे. या निवेदनावर टाकळीभान च्या सरपंच अर्चनाताई रणनवरे, ग्राम. सदस्य मयूर पटारे, दत्तात्रय नाईक,सुनील बोडखे, दिपक पवार, सौ. लता पटारे, सौ अर्चना पवार, कालींदा गायकवाड आदी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह्या आहेत,
अनधिकृत केलेले बांधकाम सोबत छायाचित्रामध्ये टाकळीभान ग्रामपंचायत ला खेटून झालेले दिसत आहे…