ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

गावाच्या विकासासाठी खेकड प्रवृत्ती बाजुला ठेवा – पवार गायरान जमिनीवरील अतिक्रमणा बाबत बैठक.

 गावाच्या विकासासाठी खेकड प्रवृत्ती बाजुला ठेवा – पवार गायरान जमिनीवरील अतिक्रमणा बाबत बैठक.

 

 

गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन रहात आसलेल्या दिन दलित व भुमिहीन नागरीकावर अतिक्रमण काढले जाण्याच्या भितीने हक्काचा निवारा जाणार आसल्याने झोप उडाली आहे. अशा वेळी आपसातील हेवेदावे व खेकड प्रवृत्ती बाजुला ठेवुन सर्व गाव पुढाऱ्यांनीएकञ येवुन ही आतिक्रमण नियमाकुलीत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आसल्याचे प्रतिपादन माजी सभापती नानासाहेब पवार यांनी बैठकिला मार्गदर्शन करताने केले. जेष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, यशवंत रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, राजेंद्र कोकणे, शिवाजी शिंदे, नारायण काळे, बंडु हापसे, प्रा. जयकर मगर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

        गायरान जमिनीवरील झालेल्या अतिक्रमणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने चांगलाच ऐरणीवर आलेला आसल्याने अतिक्रमण निष्कासित करण्याच्या नोटीसा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यामुळे गोरगरीब, आदीवासी, मागासवर्गीय, भुमिहीन नागरीकांचा हक्काचा निवारा जाणार या भितीने चांगलेच धाबे दणाणले आहे. याबाबत येथील सर्वपक्षिय कार्यकत्यांनी ग्रामसचिवालयाच्या सभागृहात बैठकिचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले कि, गायरान जमिनीवरील आतिक्रमण काढले जाणार आसल्याच्या नोटीसा नागरीकांना प्रशासनाच्या वतीने दिल्या गेलेल्या आहेत. याबाबात महसुल मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यांशी चर्चा झाली आसुन सरकारने या नोटीसांना स्थगिती दिली आहे. कोणाचेही घर मोडले जाणार नाही त्यामुळे अतिक्रमण धारकांनी घाबरुन जावु नये. गावठाण हद्द वाढीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केलेला आहे. माञ या कामात गुंतागुंत अधिक आसल्याने सरकारी जागेवर रहाणार्या सर्व नागरीकांच्या रहात्या जागेवरील अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गावपुढार्यांनी हेवेदावे विसरुन व खेकड प्रवृत्तीला फाटा देवुन गोरगरीबांचा निवारा वाचवण्यासाठी एकञ आले पाहीजे. धोंडेवाडी सारखी परीस्थिती होणार नाही याची सर्वांनी काळजी घेवुन गावाच्या विकासासाठी शिस्त लावुन घेण्याची गरज आसल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

यावेळी शिवाजी शिंदे, प्रा. विजय बोर्डे, नवाज शेख, बापुसाहेब शिंदे, भाऊसाहेब मगर, नारायण काळे यांनीही या संकटाला सामना करण्यासाठी सर्वपक्षिय कार्यकर्त्यांनी एकञ येण्याची गरज आसल्याचे मत व्यक्त केले.

    यावेळी ग्रा.प.सदस्य मयुर पटारे, सुनिल बोडखे, दत्ताञय नाईक, अबासाहेब रणनवरे, रावसाहेब मगर, बाबासाहेब बनकर, विलास दाभाडे, शंकर पवारा, उत्तम पवार, लोकसेवा विकास आघाडीचे उपाध्यक्ष रावसाहेब वाघुले, कृष्णा वेताळ, लक्ष्मण सटाले, सुधीर मगर, एकनाथ बनकर, संजय पवार, मोहन कांबळे, भैय्या पठाण, भागवत रणनवरे, अण्णासाहेब दाभाडे, मोहन रणनवरे, महेंद्र संत, रघुनाथ शिंदे, महेश लेलकर, बाबा तनपुरे, भाऊसाहेब पटारे , अशोक कचे, रमेश पटारे रामनाथ माळवदे, रामदास जाधव, दादा पवार, कारला साठे, आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

                ते सदस्य भिडले एकमेकाला

          

गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरुन एकञ येण्यावर बैठकित सगळ्याच वक्त्यांनी मार्गदर्शन केले. माञ बैठक संपताच नळी फुंकिली सोनारे, ईकडुन तिकडे गेले वारे या म्हणीप्रमाणे, एकाच प्रभागातुन निवडुन आलेले व एकाच गटाचे सदस्य सुनिल बोडखे व भाऊसाहेब पटारे यांच्यात बाचाबाची होवुन हे दोन्ही सदस्य शिव्यांची लाखोळी वाहत थेट एकमेकावर भिडले होते. काही सुज्ञ नागरीकांनी मध्यस्ताची भुमिका पार पाडीत दोघांना बाजुला केले अन्यतः ग्रामपंचायत सभागृहातच चांगलेच घमासान झाले आसते. या विषयाची बैठकिपेक्षारी खरपुस चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु होती.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे