कारागृहातील कैद्याकडुन खाजगी कामे वाहन धुवायला लावले; कारागृह महानिरीक्षक यांना तक्रार कारवाईची मागणी:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर*

*कारागृहातील कैद्याकडुन खाजगी कामे वाहन धुवायला लावले; कारागृह महानिरीक्षक यांना तक्रार कारवाईची मागणी:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर*
बीड जिल्हा कारागृहातील आधिका-यांकडुन कैद्याला खाजगी चारचाकी वाहन धुऊन घेण्याचा प्रकार उघडकीस आला असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सुनिल रामानंद अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना केली आहे.
सविस्तर माहीतीस्तव
जिल्हाकारागृहातील कैद्याकडुन आधिका-यांना कोणतीही खाजगी कामे करवुन घेता येत नसुन ते आचारसंहीतेचे उल्लंघन आहे मात्र बीड जिल्हा कारागृहातील आधिका-यांकडुन खाजगी वाहन क्रमांक एमएच १६ बीएच ८५०८ ही कैद्याकडुन धुत असल्याचे छायाचित्र हाती लागले असुन हे मानवी आधिकाराचे उल्लंघन असून संबधित प्रकरणात चौकशी करून जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडु नयेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक बीड, अधीक्षक जिल्हा कारागृह बीड यांच्यामार्फत सुनिल रामानंद अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे, अध्यक्ष मानवी हक्क आधिकार आयोग महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री,गृहमंत्री,पोलीस महासंचालक यांना ईमेल द्वारे निवेदनाद्वारे केली आहे.
मानवी आधिकाराचे उल्लंघन केल्याबद्दल मानवी हक्क आयोगाला तक्रार
जिल्हा कारागृहाच्या आवारात कैद्यांसाठी भाजीपाला लागवड केलेली असून हा भाजीपाला कैद्यांसाठीच वापरला जात असून त्यासाठी विरंगुळा म्हणून स्वेच्छेने कामे घेता येतात.मात्र खाजगी कामे आधिका-यांकडुन करून घेणे मानवी आधिकाराचे उल्लंघन असून संबधित प्रकरणात अध्यक्ष मानवी हक्क आधिकार आयोग महाराष्ट्र राज्य यांना तक्रार करण्यात आली आहे.