शुभांगी एक्वा व्यवसायाचे पाचेगाव येथे भव्य उद्घाटन

शुभांगी एक्वा व्यवसायाचे पाचेगाव येथे भव्य उद्घाटन
पाचेगाव (ता. नेवासा, जि. अहमदनगर) – येथील “शुभांगी एक्वा” या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायाचे भव्य उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. या व्यवसायाचे उद्योजक दिगंबर कहार यांनी परिसरातील नागरिकांना शुद्ध व दर्जेदार पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरुवर्य संत स्वामी बाळकृष्ण महाराज, ओम गुरुदेव जंगली महाराज, मेरुदंड आश्रम, इमामपूर हे पावन हस्ते उपस्थित होते. तसेच युनियन बँकेचे शाखा अधिकारी श्री. राजेंद्र काळे, त्यांचे जिवलग मित्र श्रीकांत पवार, व अनेक इतर मान्यवर, उद्योजक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी दिगंबर कहार यांच्या पुढाकाराचे कौतुक करत त्यांना व्यवसायात यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि आरोग्यदायी जीवनशैलीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता सर्वांसाठी आयोजित महाप्रसादाने झाली.