कत्तल करण्याच्या इराद्याने एकाच पिकअप मध्ये अकरा गोवंशीय जनावरे खचाखच भरुन जात असताना…
कत्तल करण्याच्या इराद्याने एकाच पिकअप मध्ये अकरा गोवंशीय जनावरे खचाखच भरुन जात असताना…
बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात पिकअप फसला अन टेम्पोतील जनावरे पाहुन नागरीकांनी पोलीसांना पाचारण केले अन अकरा जनावरांना जिवदान मिळाले पोलीसांनी पिकअपसह सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . दोन दिवसापूर्वी बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात पाईपलाईन फुटल्यामुळे ती दुरुस्त करुन खड्डा बुजविण्यात आला आज सकाळी अकरा वाजता अकरा गो वंश जातीची जनावरे भरुन महेंद्रा पिकअप एमएच ११ टी ५४९९ ही पिकअप गाडी वळण घेत असताना दोन दिवसापूर्वी घेतलेल्या खड्ड्यात फसली त्यावेळी टेम्पो काढण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले परंतु पिकअप मधील दृश्य पाहुन नागरीकांचा संताप अनावर झाला पिकअप मध्ये अकरा गायी दाटीवाटीने घुसविलेल्या होत्या त्यात एक गाय मूर्छितावस्थेत होती तेथे उपस्थित असलेले तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे शिवप्रतिष्ठाणचे किसन ताक्टे रोहीत शिंदे राहुल माळवदे प्रफुल्ल डावरे स्वप्निल खर्डे सागर लाहोर स्वप्निल खैरे भुषण चेंगेडीया यांनी काही अघटीत होण्या आगोदरच पोलीसांना ही माहीती कळवीली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना या बाबत कळविले त्यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या सूचनेवरुन बेलापूर पोलीस झेंडा चौकात आले व जनावरांनी खचाखच भरलेला टेम्पो ताब्यात घेतला प्रकाश पोळ रा मांजरी हा अमोल विटनोर याच्या सांगण्यावरुन या जनावरांची चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्याच्या इराद्याने घेवु जात असल्याची माहीती समजल्यावरुन पोलीसांनी कारवाई करुन त्याचे ताब्यातील तीन लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यात घेतलेली अकरा गायी व वासरे संगमनेर येथील जिवदया गो शाळेत पाठविण्यात आली आहे बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल निखील तमनर यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम१९९५ चे सुधारीत कायदा कलम २०१५ चे कलम ५, ५(ब)(क)९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो नि संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अतुल लोटके हे करत आहे