राज्यमार्गालगत गेली अनेक वर्षापुर्वी बांधलेले बस स्टँड कारण नसताना रस्ता रुंदिकरणाच्या नावाखाली गेल्या दिड वर्षापुर्वी पाडण्यात आले.
राज्यमार्गालगत गेली अनेक वर्षापुर्वी बांधलेले बस स्टँड कारण नसताना रस्ता रुंदिकरणाच्या नावाखाली गेल्या दिड वर्षापुर्वी पाडण्यात आले
टाकळीभान येथे राज्यमार्गालगत गेली अनेक वर्षापुर्वी बांधलेले बस स्टँड कारण नसताना रस्ता रुंदिकरणाच्या नावाखाली गेल्या दिड वर्षापुर्वी पाडण्यात आले होते. राज्यमार्गाचे काम पुर्ण झाले आसले तरी गावपुढारी व सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलवा टोलवी सुरु ठेवल्याने नव्याने स्टँड बांधले गेले नसल्याने शालेय विद्यार्थी व जेष्ठ नागरीकांना ऊन, वारा, पाऊस झेलत रस्यावर ताटकळत उभे रहावे लागत आसल्याने परवड झाल्याचे पहावयास मिळत आहे.
टाकळीभान येथे गेल्या अनेक वर्षापुर्वी राज्यमार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत प्रवाशांच्या सेवेसाठी सुमारे ४० फुट लांबीचे बस स्टँड बांधण्यात आले होते. त्यामध्ये उपहारगृहाचीही सुविधा करण्यात आली होती. विद्यार्थी, जेष्ठ नागरीक व प्रवाशांना उन, वारा, पावसापासुन सुविधा मिळत होती. माञ गेल्या दिड वर्षापुर्वी राज्यमार्गाच्या रुंदिकरणाचा बहाणा करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने गरज नसताना बस स्टँड जमिनदोस्त करुन साहीत्य घेवुन गेले होते. येथील सुमारे ४०० ते ४५० विद्यार्थी विद्यार्थिनी दररोज श्रीरामपुर येथे महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात आसतात. अनेक जेष्ठ नागरीक व महीलाही तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त जात आसतात. माञ एस. टी. ची प्रतिक्षा करण्यासाठी थेट राज्यमार्गावरच विद्यार्थिनी व महीलांना उन, वारा व पावसात तिष्ठत उभे रहावे लागत आसल्याने मोठी कुचंबना होते.
या बाबत आनेक वेळा गावपुढार्यांकडे गार्हाणे मांडले गेले आहे तर वृत्तपञातही याबाबत बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. माञ झोपेच सोंग केलेले गावपुढारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. श्रीरामपुर विधानसभा मतदार संघाचे आमदार लहु कानडे यांनी बस स्टँड साठी निधीही उपलब्ध करुन दिलेला आहे. माञ मानसिकता नसलेले गावपुढारी व सार्वजनिक बांधकाम विभाग हा निधी खर्च करण्यातही कसुर करीत आहे. याबाबत आता नागरीकांमधुन बोलक्या प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत व या बांधकामासाठी टंगळमंगळ करणाऱ्यांना धडा शिकवण्याचीही चर्चा सुरु झाली आहे.
सरपंचांचा सा.बा. ला उपोषणाचा ईशारा
बस थांबा ईमारत पुर्वीच्याच जागेवर बांधण्यात यावी. राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी गरज नसताना बस शेड काढण्यात आल्याने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनि व जेष्ठ नागरीकांची गैरसोय झाली आसुन उन, वारा व पावसात निवारा नसल्याने त्यांचे आतोनात हाल होत आहेत. त्यामुळे त्या जुन्या बसस्थानकाच्या जागेवरच सर्व सुविधायुक्त इमारत लवकरात लवकर बांधण्यात यावी अन्यतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रीरामपुर येथील कार्यालयासमोर ११ जुलैपासुन अमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा नुकताच महीला सरपंच अर्चना यशवंत रणनवरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.