गणेशवाडी बेडी प्रकरणी आरोपीला अटक न केल्यास सोनई पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थासह कुटुंबियांचा अमरण उपोषणाचा इशारा..

गणेशवाडी बेडी प्रकरणी आरोपीला अटक न केल्यास सोनई पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थासह कुटुंबियांचा अमरण उपोषणाचा इशारा..
सोनई -नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील दि. २२ जानेवारी रोजी रात्री चोरीचा बहाना करत किशोर डौले याला हातात महाराष्ट्र पोलीस नाव असलेली बेडी घालून व तोंडावर उशी दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तशी फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.
परंतु काही दिवसांनी संबंधित गुन्ह्यात आरोपी हा नेवासा पोलीस ठाण्यातील कर्मचारी च असल्याचे समोर आले. परंतु फिर्यादी व आरोपी हे एकाच गावातील शेवगाव तालुक्यातील असल्याने परिचय होता. त्याच ओळखीचा फायदा घेत आरोपी ने फिर्यादीशी जवळीकता वाढवत मैत्रिपूर्ण संबध प्रस्थापित केले. त्याचा फायदा घेत फिर्यादी च्या पतीस जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सहा महिने उलटुन गेले तरी संबधित गुन्ह्यातील आरोपी किरण काटे हल्ली नेमणूक नेवासा पोलीस ठाण्यात. यास अटक करण्यात आली नाही.
पोलीस आरोपीस अटक करण्यास जाणिव पुर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप पिडीत कुटुंबिय करत आहे. तरी आरोपीस लवकरात लवकर अटक न झाल्यास दि. १४ जुलै रोजी सह कुटुंबं व गणेशवाडीचे ग्रामस्थ सोनई पोलीस ठाण्याच्या समोर अमरण उपोषणास बसणार असल्याचे किशोर डौले यांनी सांगितले.
संबंधित आरोपीचा तपास सुरू आहे. परंतु मोबाईल बंद असल्याने तपासा कामी अडचणी निर्माण होत आहे. तरी लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल.
माणिक चौधरी. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनई]