श्रीरामपूर तहसीलदार यांकडे गोपाळकृष्ण दूध उत्पादक संस्थेला शासनाने प्रदान केलेल्या जागेपेक्षा

श्रीरामपूर तहसीलदार यांकडे गोपाळकृष्ण दूध उत्पादक संस्थेला शासनाने प्रदान केलेल्या जागेपेक्षा
टाकळीभान येथे जुनी गोपाळकृष्ण दूध उत्पादक संस्थेला शासनाने प्रदान केलेल्या जागेपेक्षा या सद्यस्थितीत अस्तित्वात नसलेल्या दूध संस्थेच्या नावाखाली वाढीव अतिक्रमण केल्याची तक्रार टाकळीभान येथील संदीप शांतवन जाधव यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन त्यांनी श्रीरामपूर तहसीलदार यांकडे सादर केले आहे या निवेदनात म्हटले आहे की मौजे टाकळीभान येथे गट नंबर २४५/४ हा शासनाने गोपाळकृष्ण उत्पादक संस्था टाकळीभान यांना प्रदान केला होता. सदरील क्षेत्र हे ५.४४ आर चौ. मी. इतके असून अकृषिक आहे. प्रत्यक्षात आज रोजी सदरील संस्था अस्तित्वात नसून सदर जागेवर काही धन दांडग्या लोकांनी अतिक्रमण करून तेथे व्यावसायिक वापरासाठी इमारतीचे बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे, त्यामुळे सदर गटात शर्तभंग झाल्याचे आढळून येते ,तरी मेहरबान साहेबांना या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, झालेले अतिक्रमण निरास्त करून शासनाने सदरील जागा स्वतःच्या ताब्यात घ्यावी.
अशा आशयाचे निवेदन श्रीरामपूर तहसीलदार यांकडे जाधव यांनी दिले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, मा. महसूल मंत्री, कार्यकारी अभियंता सार्वजनिक विभाग श्रीरामपूर यांना दिल्या आहेत.