गणेश खिंड रोडवरील रस्त्याला पडलेल्या भगदाडा संदर्भात मा. सभापती डॉ वंदनाताई मुरकुटे यांचे ठिय्या आंदोलन…

टाकळीभान गणेश खिंड रोडवरील रस्त्याला पडलेल्या भगदाडा संदर्भात मा. सभापती डॉ वंदनाताई मुरकुटे यांचे ठिय्या आंदोलन…
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान गणेश खिंड रस्त्यावरील पाटाच्या पुलावर गेल्या कित्येक दिवसापासून पडलेल्या भगदाडा कडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने येथे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे, तरी त्यांच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोणतीही पूर्व सूचना न देता टाकळीभान, खिर्डी, गणेश खिंड परिसरातील नागरिकांसह ठिया आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीरामपूर यांना दिला आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की टाकळीभान, गणेश खिंड, पाचेगाव, खिर्डी, वांगी, भेर्डापूर, व पुढे राहुरी तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे, तसेच या रोडवर गणेश खिंड येथे भाविक भक्तांची नेहमीच दर्शनासाठी गर्दी व वर्दळ असते त्यामुळे महत्त्वाचा असून या रस्त्याच्या पाटाच्या पुलावर जे भगदाड पडले आहे. त्यामुळे प्रवासासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे त्यामुळे वाहतूकदार, प्रवासी यांची मोठी अडचण होऊन पडलेल्या भगदाडा मुळे या रोडवर अपघात होण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागास या भगदाडाचे काम व्हावे यासाठी वारंवार विनंती केली परंतु या कामाकडे या विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले असून या पडलेल्या भगदाडा संदर्भात परिसरातील नागरिक शेतकऱ्यांसह मंगळवार दि. 26 जुलै रोजी सकाळी १० वा. या भगदाडासमोर रस्त्यावर ठिया आंदोलन करणार आहोत असे मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी निवेदनात म्हटले आहे.