राहुरी विधानसभेसाठी उच्चशिक्षित तरुण संदीप चोरमले यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

राहुरी विधानसभेसाठी उच्चशिक्षित तरुण संदीप चोरमले यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
राहुरी विधानसभेसाठी उच्चशिक्षित तरुण संदीप चोरमले हे लोक संघर्ष पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे स्वतः इंजीनियरिंग करून पुढील शिक्षण घेत असलेले सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सतत धडपड करणारे युवा नेतृत्व आहे राहुरी श्रीरामपूर नेवासा अहिल्यानगर येथील तरुण पुणे येथे नोकरी निमित्त राहतात त्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न ध्यानात घेऊन आपल्या भागात नोकरी कशा उपलब्ध होतील उद्योग व्यवसाय जास्त प्रमाणात आणण्यासाठी आत्तापर्यंतचे राजकारणी अपयशी ठरल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे मूलभूत प्रश्न याकडे दिग्गज राजकारणाचे लक्ष नसून पुढील दिशा वेगळी ठरणार आहे. तसेच राजकारण हे फक्त मोठ्या पुढाऱ्यांनी करावे व जनतेने त्यांच्या पाठीमागे राहावे पाच वर्ष त्यांच्या पाठीमागे राहून फक्त आश्वासनांना बळी पडावे तरुण हे बेरोजगार होत चालले. त्यांच्यासाठी मी उमेदवारी करत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांची हीच धडपड पाहून लोक संघर्ष पक्षाचे Advयोगेश माखने यांनी संदीप चोरमले या उच्चशिक्षित तरुणाला राहुरी मधून संधी दिली आहे
यावेळी संदीप चोरमले यांनी सांगितले की मागील पाच वर्षापासून विविध प्रश्न प्रलंबित आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील. 2014 मध्ये तत्कालीन सरकारने सांगितले होते की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की, शेतकऱ्याचे उत्पन्न पातळी खालवली आहे. GDP च्या अवघा एक ते दीड टक्का रक्कम फक्त शिक्षणावर खर्च केले जाते, कुठेतरी ही टक्केवारी वाढली पाहिजे…. विद्यार्थी म्हणून मला वाटतं. विद्यार्थ्यांसाठी ज्या स्वायत्त संस्था आहे उदाहरणार्थ सार्थी, महाज्योती, बार्टी यातील भ्रष्टाचार टोकाला पोहोचल आहे. विद्यार्थी एमपीएससी करून पास होतात त्यांना दोन दोन,तीन वर्षे नियुक्ती मिळत नाही. भाववाढीने उच्चांक गाठला आहे, ज्या गोरगरीब जनतेचे तळ हातावर पोट आहे त्यांना संध्याकाळची चिंता आहे .आपली चूल कशी पेटणार …. बेरोजगारी दिवसं दिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील ज्या नामवंत कंपन्या आहे त्याबाहेर जात आहेत, परिणामी बेरोजगारी वाढत आहेत. अनेक ज्वलंत प्रश्न आहे हे फक्त उदाहरण आहे, हे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार असो वा विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात मग्न आहे. सरकार कुठलाही असो जनतेच्या मूलभूत प्रश्नावर काम केलं पाहिजे…. आम्ही जे मतदान करतो ते पाच वर्ष जनतेच्या सेवेतील,जनतेचे प्रश्न सोडवणार सरकार आम्हाला पाहिजे यासाठी आम्ही मतदान करतो, पण त्याचा परिणाम आम्हाला वेगळाच बघायला मिळतो जे लोक प्रतिनिधी निवडनुकीच्या काळात आमिषचा पाऊस पाडतात तेच लोक प्रतिनिधी जनतेकडे पुन्हा मतदान झाल्यावर बघत पण नहीं. वरील सर्व मुद्यांचा सगळा विचार करून प्रामाणिक,कष्टाळू,मेहनती तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे त्याची सुरवात स्वतःपासून झाली पाहिजे हाच विचार घेऊन मी राहुरी विधानसभे साठी अर्ज दाखल केला आहे विश्वास आहे की आपण सोबत राहाल
🙏🏻🙏🏻
आपला संदीप सोपान चोरमले..