तिळापुर व वांगी बुद्रुक येथे शासन आपल्या दारी अभियान आढावा बैठक संपन्न.
तिळापुर व वांगी बुद्रुक येथे शासन आपल्या दारी अभियान आढावा बैठक संपन्न.
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथे शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत तिळापुर मध्ये सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित असताना कार्यक्रम संपन्न झाला त्यामध्ये प्रामुख्याने रेशन कार्ड दुबार काढणे विभक्त करणे या कामावर जास्तीत जास्त जोर देण्यात आला शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना कामे जागेवरच होतील अशी अपेक्षा होती परंतु फक्त त्याबद्दल माहिती देण्यात आली तसेच लागणारे रहिवासी दाखले उत्पन्न दाखले याबद्दल माहिती देऊन त्याची पूर्तता करण्यात आली शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अजून यशस्वीरित्या पार करावयाचा झाल्यास सर्व कामे एकाच ठिकाणी एकाच वेळी जर झाली तरच त्या कामाचा नागरिकांना फायदा होईल असे काही नागरिकांचे मत आले.
यावेळी तलाठी दुशिंग मॅडम कृषी सहाय्यक शिंदे मॅडम मांजरीचे PHC खंडारे डॉक्टर बाचकर मॅडम तीळापुर जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक रुपनर सर नारायण सरोदे सर अंगणवाडी सेविका जाधव काकड आचपळे मॅडम ग्रामसेवक यमुल कर्मचारी नारायण तूवर सरपंच बापूसाहेब आघाव व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीरामपूर तालुक्यातील पुर्व भागातील वांगी बुद्रुक येथे शासन आपल्या दारी अभियान तलाठी प्रविण बाजीराव सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हि बैठक पार पडली या योजनेची माहिती देताना नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत कन्या माझी भाग्यश्री विविध आवास योजनासह अन्य योजनांचा लाभ प्रत्येकाने आवर्जून घेतला पाहिजे त्याच प्रमाणे ग्रामविकास प्राथमिक माध्यमिक उच्च व तंत्रशिक्षण विभाग महिला व बाल विकास सामाजिक विकास न्याय कृषी पशुसंवर्धन आरोग्य अन्न व नागरी पुरवठा महात्मा गांधी रोजगार हमी योजना ऊर्जा सहकार विभाग जिल्हा अग्रणी बँक विविध महामंडळ आदी विभागाच्या शासकीय योजना या विषयी नागरीकांना माहीत देण्यात आली त्याच प्रमाणे श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना नविन मतदार नोंदणी मतदार यादी दुरुस्ती शौचालय अनुदान शेळी पालन कुकूट पालन यावर उपस्थित सर्व विभागांचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी तलाठी सुर्यवंशी डॉ एच डी खामकर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ काकडे दादा ग्रामसेविका सौ शितल बाचकर मा सरपंच संजय भिसे धनंजय माने ज्ञानेश्वर लकडे सरपंच ज्ञानदेव बिडगर तसेच आशा, राशन दुकानदार मैड शिक्षक बागुल सर तसेच नागरीक उपस्थित होते