गावचा मुखिया रक्षकच बनला असता भक्षक

गावचा मुखिया रक्षकच बनला असता भक्षक
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सप्तपदी मंगल कार्यालयाचे समोरून संकेत गायकवाड हा घरी जात असताना दिनांक 18 4 2025 रोजी रात्री पाच ते सात व्यक्तींनी जातिवाचक शिवीगाळ करून तलवारी सारख्या वस्तूने व लाकडी दांडक्याने उपसरपंच काना खंडागळे व बाहेरगावातील व्यक्तींनी जबर मारहाण केल्याने त्यावरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फिर्यादीत म्हटले आहे की, मंगल कार्यालयाचे समोरून घरी जात असताना, तेथे कान्हा खंडागळे, तुषार पवार प्रशांत नागले ,राजू नागले ,सनी जाधव व इतर दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे हा म्हटला की कारे…. …. जास्त शहाणा झाला काय, तू …… आहे. तुझी आमच्या समोर उभा राहायची लायकी नाही. तुमची चप्पल शिवायची लायकी आहे. तुला गावात राहू देणार नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली त्याच वेळी तुषार पवार यांनी तलवार सारख्या वस्तूने संकेत गायकवाड यांच्या डोक्यात मारले पळत असताना काना खंडागळे यांनी पुन्हा संकेत याला तलवारी सारख्या वस्तूने पाठीमागून मारले त्याच वेळेस प्रशांत नागले, राजू नागले, सनी जाधव यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली.
इतर दोन व्यक्तींनी याला काय मारायचे ते मारा आपण पोलिसांना मॅनेज करू असे म्हणून त्यांनीही व इतरांनी ही शिवीगाळ केली. त्यानंतर मला कापसे हॉस्पिटल येथे ऍडमिट केले असे संकेत गायकवाड यांच्या जबाबवरून गुन्हा रजिस्टर नंबर व कलम 236/ 2025 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 189(1) 189 (2)189 (4) 190 191 (2) 118(1) अनुसूचित जाती जमती(r)(s) आर्म अॅक्ट4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास डी वाय एस पी शिवपूजे हे करत आहे.
फिर्यादी संकेत गायकवाड याला काय मारायचे ते मारा. आपण पोलिसांना मॅनेज करू, असं बोलणे म्हणजे पोलिसांवर प्रश्नचिन्हच आहे. खरोखरच पोलिसांचा वचक कमी झालाय का ? अशी गावांमध्ये दबक्या आवाजात चर्चा ऐकवयास मिळत आहे. उपसरपंच पदावर असणारा व्यक्ती गावात दहशत करत असल्याचे देखील बोलले जात आहे. यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.