आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीदेश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

पेट्रोल पंपाजवळ बस आणि टेम्पो चा भीषण अपघात;एक जण जागीच ठार तर पाच गंभीर जखमी*

*राक्षी पेट्रोल पंपाजवळ बस आणि टेम्पो चा भीषण अपघात;एक जण जागीच ठार तर पाच गंभीर जखमी*

 

शेवगाव-गेवराई राज्य महामार्गवरवर राक्षी येथे एसटी बस व ४०७ टेम्पो यांच्यात आज सकाळी दहाच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एसटी बसच्या चालकाच्या प्रसंगावधान मुळे बसमधील प्रवाशी बालबाल बचावले गेले व मोठा अनर्थ टळला गेला,परंतु पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामस्थांनी तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

 

   शेवगाव- गेवराई राज्यमार्गावर महामंडळाची एसटी बस एम एच ४० या ५५७१ ही नव्याने सुरू झालेली अहमदनगर- पुसद ही एसटी बस आज शनिवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास शेवगावहुन -गेवराईच्या दिशेने जात असताना राक्षी ता.शेवगाव नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर चापडगावहुन शेवगावच्या दिशेने जाणारा फळ माल वाहतूक करणारा ४०७ टेम्पो क्रमांक एम.एच.०८ डब्लू. १४७१ यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन टेम्पो चालक जागीच ठार झाला, तर एसटी बस चालक भोपालसिंग जाणूसिंग पवार रा.पुसद जि. यवतमाळ व बसमधील प्रवासी आकाश भगवान रोठे रा.बीबी ता. लोणार जि.बुलढाणा तसेच नेवासा पंचायत समितीचे कर्मचारी ही अपघातात जबर जखमी झाले आहेत.वाहक संतोष सीताराम आढाव व इतर प्रवाश्यांना जबर मार लागला आहे. जखमींवर शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपाचार सुरू आहेत अपघात होताच राक्षी ग्रामस्थ व पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. एसटी बस चालकाने एसटी बस राज्य मार्गलगत रस्त्यावरून शेतात घातल्याने मोठी दुर्घटना टळली गेली. लगत विजेचा खांब होता त्यावर बस गेली असती तर मोठी घटना घडली असती.

 

   सदर घटनेची माहिती तातडीने शेवगाव पोलिसांना देण्यात आली मात्र सुमारे दीड तासाने घटनास्थळी दोन पोलीस कर्मचारी दाखल झाले होते तो पर्यंत टेम्पो चालकाचा देह जागीच टेम्पोत मदतीअभावी अडकलेला होता. मयत टेम्पो चालकाची ओळख मात्र पटली नाही.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे