आळंदी पोलिस यांनी बोलवली माउलींच्या पालखीचे मानाचे खांदेकरी यांची बैठक*
*आळंदी पोलिस यांनी बोलवली माउलींच्या पालखीचे मानाचे खांदेकरी यांची बैठक*
*पंचक्रोशितील लोक खांदे करी नावाखाली मदिरात नको हा निर्णय घेत बैठक संपन्न*
आळंदीयेथे पोलिस स्टेशन मध्ये आज पालखी सोहळ्या च्या बाबत माऊली च्या पालखी चे मानाचे खांदेकरी यांचे बाबत नियोजन बैठक वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे यांनी आयोजीत केली होती . दक्षता कमिटी सदस्य श्री डी डी भोसले पाटिल व श्री प्रकाश कुऱ्हाडे पाटिल तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी प्रमूख विश्वस्त ॲड विकास ढगे. विश्वस्त डॉ अभय टिळक. माजी नगरसेवक प्रशांत दादा कुऱ्हाडे. माजी नगरसेवक आदित्य राजे घुंडरे.शिवसेना नेते उत्तम गोगावले . माजी नगरसेवक विष्णू वाघमारे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष चे युवा नेते रोहन कुऱ्हाडे. जय गणेश गृप. सिद्धार्थ गृप. स्थानिक सर्व सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी यांचे उपस्तीतीत बैठक पार पडली. गर्दी वर नियंत्रण आणत केवळ आळंदी ग्रामस्थ यांनाच मंदीर प्रवेश द्यावा पंचक्रोशी ग्रामस्थ मंदीरात आळंदी कर ग्रामस्थ चे जागी मंदीरात खांदेकरी म्हणूण येतात त्यामुळे सर्वांना नाहक त्रास होत नियोजन बिघडत असलेची भुमिका माजी नगरसेवक डी डी भोसले पाटिल आणि माजी नगरसेवक प्रशांत दादा कुऱ्हाडे यांनी मांडली त्यामुळें प्रत्येक मंडळातील केवळ पाच प्रतिनिधि खांदेकरी म्हणूण मंदीर प्रवेश आणि पंचक्रोशीतील व्यक्तींना खांदेकरी म्हणूण पास नको असा एकमताने निर्णय घेत त्यावर अमलबजावणी करावी अशी मागणही प्रमूख विश्वस्त ऍड विकास ढगे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे यांना केली आहे . तसेच सर्व खांदेकरी यांना ड्रेस कोड हि ठरविण्यात आला असून पांढरी टोपी पायजमा शर्ट असा पेहराव बंधन कारक करन्यात् आला आहे . स्थानिक कार्यकर्त्या च्या गर्दी वर नियंत्रण राहत पालखी सोहळा उत्तम रीतीने पार पडावा यासाठी जय गणेश गृप चे प्रशांत दादा कुऱ्हाडे आणि शिवस्मृत्ती प्रतिष्ठान दत्तनगर चे रोहन दादा कुऱ्हाडे यांनी आमचा एक हि कार्यकर्ता मंदीर प्रवेश साठी नसेल तसेच खांदेकरी पास साठी आग्रह करनार नसून आम्हाला मंदिर प्रवेश पास नको . आम्हीं पालखी मंदिरातून बाहेर आली की खांदे लावू असा महत्व पूर्ण निर्णय जाहिर केला मंदीर व्यवस्थापन समिती आणि आळंदी पोलिस यांनी या बाबत त्यांचे विशेषअभिनंदन केलें आहे कार्यक्रमाची सांगता आभार मानून संकेत वाघमारे यांनी केली