दिपक बर्डे च्या आरोपींना फाशी द्या भोकर येथे रस्ता रोको

दिपक बर्डे च्या आरोपींना फाशी द्या भोकर येथे रस्ता रोको
टाकळीभान प्रतिनिधी -भोकर येथील दिपक बर्डे च्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, संविधान व न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे ,म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे, मात्र आमचा अंत पाहू नका आरोपींना सहकार्य करणाऱ्या आरोपींना सहआरोपी करा, दिपकला न्याय द्या अशी मागणी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी भोकर येथे राज्यमार्ग 44 रस्ता रोकोआंदोलनात केले,
आज भोकर येथे एकलव्य संघटनेचे दीपक बर्डे यांचे अपहरण करून खुन झाल्याच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दीड तास रस्ता रोको करा केला ,होता दिपक चा मृतदेह तातडीने शोधा, अशी आंदोलनची मागणी होती याशिवाय हा खटला फास्टट्रॅकवर कोर्टात चालवा, आणि आरोपीचे तातडीचे फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी शिवाजी ढवळे यांनी यावेळी करण्यात आली,
यावेळी डीवायएसपी संदीप मिटके आंदोलन करताना म्हणाले, या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल , अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे, या आरोपींना ज्यानी कोणी मदत केली असेल ,त्यांचे पुरावे पोलीस शोधत आहे, पुरावा पाहून त्यांच्या सहआरोपी करण्यात येईल, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी राज्य सरकारला, लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येईल ,समाज कल्याण खात्याचे आठवडाभरात प्रस्ताव सादर करण्यात केला जाईल, असा असे यावेळी डिवायएसपी संदीप मिटके यांनी सांगितले,
यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी निवेदन स्वीकारले कायदेशीर तपास होईल शासनापर्यंत तुमच्या मागण्या पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले, आंदोलन शांततेच्या मार्गाने झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांचे आभार मानले आंदोलनात,
यावेळीजिल्हा कार्याध्यक्ष देविदास माळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भालेराव लक्ष्मण साठे ज्ञानेश्वर बडे बबन आहेर कृष्णा बर्डे लहानु मोरे सर्जेराव आहेर रमेश निकम साहेबराव बर्डे सुभाष मोरे रावसाहेब खैरे उपस्थित होते या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त होता.