गाव संरक्षणात गणेश विसर्जन हा बेलापुरकरांचा स्तूत्य उपक्रम -पोलीस अधिक्षक मनोज पाटील

गाव संरक्षणात गणेश विसर्जन हा बेलापुरकरांचा स्तूत्य उपक्रम -पोलीस अधिक्षक मनोज पाटील
गाव संरक्षणात गणेश विसर्जन शांततेत पार पाडून बेलापूरगावाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असुन अशा प्रकारे सर्वांनी कृती केल्यास पोलीस खात्यावरील वाढता ताण निश्चितच कमी होण्यास मदत होईल असा विश्वास पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतक महोत्सव व गणेशोत्सवाचे औचित्य साधुन देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न व्हावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्यासाठी गावातील शिष्टमंडळ अहमदनगर येथे गेले होते त्या वेळी गावाने आत्तापर्यत वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असुन सर्व धर्मिय प्रार्थना स्थळावरील भोंग्यावरुन राष्ट्रगीत लावण्यात आले होते पंधरा आँगस्टचे ध्वजारोहन सर्व धर्मिय संत महंताच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गणेशोत्सवा दरम्यान जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता सर्व गणेश मंडळ व गणेश भक्तांच्या सहकार्यातुन कसलेही विघ्न न येता मिरवणूक शांततेत पार पडली .त्यामुळे आपण देखावा स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केली चांगले उपक्रम राबविणारे गाव म्हणून बेलापुरची ओळख असुन या कार्यक्रमास निश्चितच येईल असे अश्वासन पोलीसा अधिक्षक मनोज पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले या शिष्टमंडळात जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे ,गांवकरी पतसंस्थेचे संचालक अजिज शेख मोहासीन सय्यद दादासाहेब कुताळ आदिंचा समावेश होता