आझाद मैदान येथे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर तसेच पदाधिकारी यांचे आमरण उपोषण सुरु
आझाद मैदान येथे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर तसेच पदाधिकारी यांचे आमरण उपोषण सुरु
श्रीरामपूर येथील शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी न्याय हक्क मिळविण्यासाठी तसेच प्रशासनाला वेळोवेळी सूचित करून देखील ही अनेकदा लेखी निवेदन तसेच लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी श्री नितीन नाथा गुजरे
सा बा श्रीरामपूर मधील बेकायदा झालेली बदली रद्द करून त्याच्या कार्यकाळात झालेल्या MB खाडाखोड करून झालेल्या सर्व कामाची SIT मार्फत चौकशी व्हावी यासाठी मागणी केली होती संबंधित अधिकारी हे राजकीय पावर वापरून पुन्हा पुन्हा श्रीरामपूर कडे बदली करत असल्याचे निदर्शनास आले आहेत तरी अशा अधिकाऱ्यावर चौकशी होऊन कारवाई व्हावी यासाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील देवकर याचे उपोषण सुरू झाले यावेळी तालुकाप्रमुख बापूसाहेब शेरकर, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ उपतालुकाप्रमुख लक्ष्मण पाचपिंड, संतोष डहाळे,अशोक जाधव हे उपोषण पाठिंबा देण्यासाठी बसले आहे परिसरातून याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे प्रसंगी न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण तिव्र स्वरूपात छेडण्याचा संकल्प केला असल्याची माहिती श्री राजेन्द्र देवकर यांनी दिली या आशयाचे लेखी निवेदन विवीध ठिकाणी तसेच शासन दरबारी दिले आहे