ज्ञान माउली इंग्लिश स्कूल मध्ये महिला दिन मोठ्या उत्सव साजरा

ज्ञान माउली इंग्लिश स्कूल मध्ये महिला दिन मोठ्या उत्सव साजरा
जागतिक महिला दिनानिमित्त ज्ञानमाऊली इंग्लिश स्कूल, घोडेगाव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. इंग्रजी वकृत्व स्पर्धा व त्याबद्दल बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. त्यासाठी सेंट अँन्स हॉस्पिटल येथील सिस्टर अंजली ह्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिल्या. त्यांनी मुलांच्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षण केले तसेच मुलांना मार्गदर्शन व महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचे विचार मांडले. तसेच मॅनेजर फा. सतीश कदम ह्यांनी देखील महिला दिनावर भाष्य करत शाळेतील सर्व महीला वर्गाला शुभेच्छा दिल्या. पिटर बारगळ सरांनी कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन करून मुलांना कार्यक्रमासाठी प्रोत्साहित केले. मारिया मॅडम ह्यांनी देखिल उद्योजक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या मॅडमला निमंत्रित केले. त्यांनी मुलांना चॉकलेट्स वाटले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन रेश्मा मॅडम ह्यांनी करत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता शाळेचे प्राचार्य फा. डॉमिनिक ब्राम्हणे ह्यांच्या आईवर रचलेल्या गीताने झाले. तसेच त्यांनी आजच्या महिलेचा लढा हा कोणा पुरुषाच्या विरोधात नसून तर स्रीचा स्री विरुद्ध केलेला लढा आहे. कारण स्रीभ्रून हत्येचे सर्वात मोठे कारण स्रीच आहे. सासू -सून ह्यांना छळणारे तेच आहेत. म्हणून एका स्रीने दुसऱ्या स्रीचा आदर करायला शिकावे हे त्यांनी त्यांच्या भाषणातून सर्वांसमोर मांडले. सरतेशेवटी घोडेगावचे केंद्रप्रमूख सन्माननीय श्री. सुखदेव ढवळे साहेब ह्यांनी देखील हजेरी लावत महिलांना मार्गदर्शन केले.