16 वर्षीय दाहवीच्या मुलीचा लावला बालविवाह

बीड जिल्ह्यात धक्कादायक प्रकार
परळीत 16वर्षीय दाहवीच्या मुलीचा लावला बालविवाह
बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बाल विवाहाने डोक वर काढल्याचे समोर आले आहे दाहवीच्या वर्गात शिक्षण घेत असणार्या 16वर्षीय अल्पवयीन मुलीचा बाल विवाह आज तिच्या परिक्षाच्या दिवशीच लावण्यात आलाय
याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांसह, मुलाच्या आई- वडिलांवर त्याचबरोबर दोघांच्याही मामावर, फोटोवाल्यावर, भटजीवर, आचार्यावर आणि मंडपवाल्यासह तब्बल 183 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीवरून, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एका 16 वर्षीय मुलीचा, गावालगत असणाऱ्या चोपणवाडी येथील तरुणाशी आज दुपारी बालविवाह झाला. सदर मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून तिचा आज गणित विषयाचा पेपर सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे होता. मात्र ती पेपरला गैरहजर होती. त्याचवेळेत तिचा बालविवाह झाला.
बीड येथील चाईल्ड लाईन सदस्य तत्वशिल कांबळे यांना माहिती होताच त्यांनी बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासकीय यंत्रणा नंदागौळ ला पोहचण्यापुर्वीच बालविवाह झाला. त्यानंतर तत्वशिल कांबळे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली.
या प्रकरणी आता मुलीच्या आई- वडीलांसह मुलावर व त्यांच्या आई- वडिलांवर, मामा-मामीवर, भटजीवर, फोटोवाल्यावर, मंडपवाल्यावर, आचार्यावर आणि नंदागौळसह चोपणवाडी लग्नाला असणाऱ्या तब्बल 183 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.दरम्यान यामुळं पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात बालविवाहाच्या समस्येने डोकं वर काढल्याचं समोर आलंय.