अखेर शासनाच्या आदेशानुसार उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी अनधिकृत रस्त्यावरील अतिक्रमण बांधकाम पाडून रस्ता मोकळा
टाकळीभान येथीलअखेर शासनाच्या आदेशानुसार उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी अनधिकृत रस्त्यावरील अतिक्रमण बांधकाम पाडून रस्ता मोकळा केला,
टाकळीभान स्टैंड परिसरातील जुना रस्ता अडवून भिंत बांधून केलेले अतिक्रमण शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीस परवानगी मिळाल्याने उपसरपंच कान्हा खंडागळे, प्रभारी ग्रामसेवक प्रवीण ढुमणे , ग्रामपंचायत कर्मचारी यामार्फत काढून घेण्यात आले. अतिक्रमण केल्यानंतर ग्रामपंचायतने व मंडळ अधिकारी यांनी अतिक्रमणाची पाहणी करून पंचनामा ही या अगोदर केला त्यावर आदेश होऊन हे अतिक्रमण काढण्यात आले.टाकळीभान गावांमध्ये गेल्या तीन-चार महिन्यांपासून अनधिकृत बांधकामाचे पेव फुटत असून त्यातून, आंदोलने, उपोषण आदी प्रकार सर्रास घडत आहेत.शासकीय अधिकारी व गावातील प्रशासनाची ही डोकेदुखी झाली आहे. शासनाने यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन शासनाचा अनधिकृत बांधकामास कोणतीही परवानगी नसल्याचे या धडक कारवाईवरून निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामास चाप बसणार असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.शासन व गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने अनधिकृत बांधकामा संदर्भात उचललेल्या या धाडसी पावलाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले असून सरपंच उपसरपंच यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही,- सरपंच अर्चना रनणवरे ,