भोकर सबस्टेशनमधुन पाच दिवसात विजपूरवठा सुरळीत करा अन्यथा रास्तारोको…

भोकर सबस्टेशनमधुन पाच दिवसात विजपूरवठा सुरळीत करा अन्यथा रास्तारोको…
टाकळीभान प्रतिनिधी- गेल्या पंधरा दिवसांपासून कमी दाबाने मिळणाऱ्या वीजपुरवठयास कंटाळून श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व परिसरातील शेतकर्यांनी भोकर सबस्टेशनला अधिकारी कर्मचाऱ्यांना अचानक घेरावो आंदोलन करत पाच दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर ११ मार्च रोजी श्रीरामपूर नेवासा मार्गावर खोकरफाटा येथे तीव्र रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला.
या सबस्टेशनमधुन श्रीरामपूर पूर्व गोदाकाठ परिसरातील कमालपूर,घुमनदेव,माळवाडगांव, मुठेवाडगांवसह भोकर, खोकर,टाकळीभान,कारेगाव (काही भाग) वडाळामहादेव या गावांना वीजपुरवठा केला जातो. तालुक्यातील अन्य सबस्टेशनच्या तुलनेत या भोकर सबस्टेशनची जुनाट मशिनरीप्रमाणे यंत्रणाही खिळखिळी झाली आहे.श्रीरामपूर शहराचे कनिष्ठ अभियंता (जे.ई.) निकम हे वर्ष दोन वर्षांपासून प्रभारी आहेत. अधिकृत तारतंत्री कर्मचारी अवघे दोन बाकी हंगामी रोजंदारीवर असलेले कर्मचारी आहेत.शेतकरी रात्रीचा दिवस करून कांदा ,गहु,मका ऊस पिकास अखेरचे पाणी देताना मेटाकुटीला आले आहे.रात्री लाईट देता तर द्या पण तीही सुरळीत नाही.रात्ररात्र जागून वीज गायब होते.कधी येईल यासाठी सबस्टेशनची दुरध्वनी यंत्रणा चालू नाही. बारावी पाठोपाठ दहावीच्या परिक्षा सूरू आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी लाईट नाही. कंत्राटी कर्मचारी मोबाईल बंद करून ठेवतात. गेली चार दिवसांपासून खुपचं खेळखडोबा झाल्याने कार्यक्षेत्रातील गावोगावच्या सर्वपक्षीय संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी १० वाजता अचानक घेरावो आंदोलन केले.यावेळी महावितरण अधिकाऱ्यास. कर्मचारी ऊपस्थित होते.तालुका पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता.
संतप्त सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी संतप्त परंतु शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी, तालुका काँग्रेसचेे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणचे, कमालपुरचे सरपंच सचिन मुरकुटे, भोकरचे उपसरपंच महेश पटारे, मुठेवाडगांवचे सरपंच सागर मुठे, माळवाडगांवचे भाऊसाहेब काळे, शेतकरी संघटनेचे शरद आसने, कारेगांवचे शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, सुभाष पटारे, युवराज जगताप, छावाचे नितीन पटारे, घुमनदेवचे युवा कार्यकर्ते भैरव कांगुणे, संभाजी ब्रिगेड चे शिवाजी पवार अनिल पाचपिंड, ज्ञानेश्वर म.मुठे,या सर्वांनी आपल्या भाषणातून भोकर सबस्टेशन कारभारा व वीज खेळखंडोबा विषयी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी कमालपूर,घुमनदेव,भोकर, खोकर,कारेगाव मुठेवाडगांव, माळवाडगांव येथील शेतकरी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीजपुरवठा सुरळीत चालण्यासाठी
मार्च पर्यंत रात्रंदिवस कर्मचारी तैनात – छावडा
भोकर सबस्टेशनला वरतूनच कमी दाबाने वीजपुरवठा मिळत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची स्पष्ट कबुली श्रीरामपूर विभागाचे सहा.कार्यकारी अभियंता छावडा यांनी शेतकऱ्यांसमोर बोलताना दिली. आपला मार्च पर्यतचाच प्रश्न असल्याने आपण येथे येण्यापूर्वी आम्ही तातडीची आढावा मिटींग घेतली.मार्चपर्यंत रात्रंदिवस कर्मचारी तैनात ठेवून वीजपुरवठा वीजपुरवठा वीजपुरवठा सुरळीत करू. पाहिजे तेवढा उच्च दाबाचा विजपुरवठा सबस्टेशनला मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास आपल्या तीव्र भावना आपल्या तीव्र भावना आपल्या तीव्र भावना लेखी स्वरूपात कळवू असे आश्र्वासन दिले.यावेळी जे.ई.निकम ऊपस्थित होते.