चांदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधाचा तुटवडा.

चांदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधाचा तुटवडा.
नेवासा तालुक्यातील चांदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमच औषधाचा तुटवडा असल्यामुळे जनावरावर उपचार करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी असून प्रशासनाने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत असून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली जनावरा उपचार होण्यासाठी औषधे नसल्याने जनावरावर उपचार करण्यासाठी खाजगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे येथील दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून सुद्धा औषधा अभावी ती सुद्धा हतबल झाले आहेत वारंवार मागणी करून सुद्धा औषधे उपलब्ध करून दिली जात नसल्याने पशुवैद्यकीय अधिकारी जनावरावर उपचार कसे करणार हाच खरा प्रश्न आहे सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये औषधे नसल्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी खाजगी मेडिकल मधून औषधे आणण्याचा सल्ला पशुपालकांना देतात शेतकरी आता खाजगी डॉक्टरना पसंती देऊ लागले आहेत. चांदाआणि आजूबाजूच्या गावातील वाड्या वस्त्या वरील व परिसरातील गावातील जनावरे उपचारासाठी पशुपालन येथे आणतात मात्र येथे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून सुद्धा औषधा अभावी उच्चार करण्यास असमर्थ ठरत आहे तरी तरी जिल्हा परिषद प्रशासनाने चांदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे परिसरामध्ये शेतीला जोड धंदा म्हणून दुध धदयाकडे पाहिले जाते मात्र आता खाद्याचे दर पाहता दूध धंदा न परवडणारा झाला आहे त्यातच जनावर आजारी पडल्यास त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने व सरकारी दवाखान्यांमध्ये औषधी नसल्याने खाजगी डॉक्टरांकडे व खाजगी मेडिकलमध्ये औषधी घेऊन उपचार करणे मोठ्या जिकरीचे काम आहे त्यातच सरकारी दवाखान्यांमध्ये औषधाचा कायमच दूध वडा असल्याने सहकारी पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे शोभेची वास्तू बनली आहे.
चांदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना हा श्रेणी एक चा म्हणून घोषित करण्यात आला आहे श्रेणी एक मधील दवाखान्यामध्ये अशी परिस्थिती असेल श्रेणी दोन मधील दवाखान्यात परिस्थिती कशी असेल याचा विचार केलेला न केलेला बरा कमीत कमी मुक्या जनावरावर तरी प्रशासनाने दया दाखवावी