भोकर येथील सब स्टेशन हद्दीतील शेती वीजपुरवठा सोमवार पासून 8 तास नियमित न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडणार-प्रदीप वाघ

भोकर येथील सब स्टेशन हद्दीतील शेती वीजपुरवठा सोमवार पासून 8 तास नियमित न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडणार-प्रदीप वाघ
टाकळीभान- प्रतिनिधी – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील सब स्टेशन हद्दीतील शेती वीजपुरवठा सोमवार पासून 8 तास नियमित न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडणार असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप वाघ यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केला आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वाघ यांनी म्हटले आहे की, भोकर सबस्टेशन हद्दीतील परिसरातील गावांना वीज पुरवठा नियमित होत नसल्याकारणाने विहिरींना व बोरवेल यांना पाणी असतानाही शेतकऱ्यांची पिके डोळ्यादेखत जळून जाताना दिसत असून. वारंवार सब स्टेशन कडे तक्रार करूनही काही उपयोग होत नसून अधिकारी शेतकऱ्यांना उडवा उडीचेच उत्तर देत असून या अधिकाऱ्यांच्या विरोधात लवकरच आमचे नेते नामदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार संबंधित खात्याचे ऊर्जामंत्री यांना भेटून संबंधित महावितरणअधिकारी यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार दाखल करणार आहे असेही वाघ यांनी सांगितले