अखेर सागर पवार नी आत्महत्या का केली ?
अखेर सागर पवार नी आत्महत्या का केली?
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द येथील तरुण व्यवसायिक सागर धोंडीराम पवार वय २२ वर्ष या तरुणाने वांगी बुद्रुक लगत वांगी खुर्द हद्दीमध्ये स्वतःचे मोटर सायकल रिपेरिंग तसेच पंचर व्यवसाय करत असलेल्या पत्र्याचे साह्याने तयार केलेल्या दुकानांमध्ये सागर पवार नी दुकानात अंदाजे १२ ते १ वाजेच्या सुमारास पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली परंतु आत्महत्या करण्याच्या अगोदर सागर ने दुकान बंद केले होते फोन उचलत नाही म्हणून वडील धोंडीराम पवार व मोठा भाऊ किशोर हे दुकान लावलेली आहे परंतु उघडेच असल्याचे दिसून येत असल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता सागर दोरीला लटकत असल्याचे पाहून मोठ्याने आरडाओरडा केला त्यावेळेस आसपासचे नागरिक जमा झाली त्यानंतर श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला माहिती कळवली असता ड्युटीवर असणारे कर्तव्यदक्ष पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र पवार पोलीस मित्र बाबा सय्यद होमगार्ड बाबासाहेब पवार हे घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह खाली काढून घेऊन उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपूर कामगार हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला यावेळी वांगी खुर्द पोलीस पाटील गायकवाड सरपंच उपसरपंच वांगी खुर्द वांगी बुद्रुक ग्रामस्थ उपस्थित होते सागर हा अविवाहित होता आत्महत्या का केली हे कारण समजू शकले नाही पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे.