महाराष्ट्र राज्यांचे सहकार मंत्री मा.ना.श्री.अतुल मोरेश्वर सावे यांची जिजाऊ पतसंस्थे्च्या ठेवीदारांनी समक्ष घेतली भेट.
महाराष्ट्र राज्यांचे सहकार मंत्री मा.ना.श्री.अतुल मोरेश्वर सावे यांची जिजाऊ पतसंस्थे्च्या ठेवीदारांनी समक्ष घेतली भेट.
शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी नगर जिल्हा दौ-यावर असलेले महाराष्ट्र राज्यांचे सहकार मंत्री मा.ना.श्री.अतुल मोरेश्वर सावे यांची जिजाऊ पतसंस्थे्च्या ठेवीदारांनी समक्ष भेट घेतली . यावेळी नामदार सावे यांना ठेविदारांचे वतीने निवेदन व पतसंस्थेत झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यात आले व भ्रष्ट संचालकांच्या भ्रष्टाचाराचा पाढा त्यांच्या
समोर मांडण्यांत आला. पतसंस्थेत एकूण दहा कोटी रुपयांपैकी साडेसात कोटी रुपये अफरा तफर,भ्रष्टा्चार करुन लांबविण्यांत आल्याचे मंत्री महोदयांना सांगितल्या वर त्यांनी सांगितले की या भ्रष्टांचारास पतसंस्थेंतील सर्व संचालक मंडळ , व्यवस्थापक/सचिव, सर्व कामगार व संबंधीत सर्व अधिका-यांना जबाबदार धरुण त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यांत येईल व त्यांना तुंरुंगात पाठवून संचालकांच्या मिळकती विकून ठेवीदारांचे पैसे देण्यात येतील असे आश्वासन मंत्री महोदयांनी ठेवीदारांना दिले.तसेच सदर प्रकरणाची सुनावणी लवकरच मंत्रालयात त्यांच्या समोर लावण्यात येईल असेही सांगितले. यावेळी राजमाता जिजाऊ ठेवीदार बचाव कृती समितीच्या वतीने राजेंद्र जाधव,सुरेश माळवदे, मंगेश पांडे कुमार डावखर हे उपस्थित होते.
तसेच गुरुवार दिनांक 22 सप्टेंदबर 2022 रोजी लोणी बु येथे महसूल मंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट जिजाऊ पतसंस्थेंच्या ठेवीदारांनी घेतली होती व त्यांना ना ही निवेदन सादर करण्यात आलेले आहे