आळंदी पोलिस यांना पालखी सोहळा २०२२ निमित्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे कडून कलम १४४(१)(२) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई अंमलबजावणीसाठी आदेश

*आळंदी पोलिस यांना पालखी सोहळा २०२२ निमित्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे कडून कलम १४४(१)(२) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई अंमलबजावणीसाठी आदेश जारी*
*वारकरी बांधवांनी आळंदीतील इंद्रायणी नदी चे पाणी आणि शहरातील विहिरी चे पाणी पिणे साठी वापरण्यावर आळंदी पोलिस यांचे कडून निर्बंध*
आळंदी देवाची प्रतिनिधि आरिफ भाई शेख
आळंदी (दि.१७) आळंदीत पोलिस प्रशासन वारी साठी सज्ज झाले आहे .कलम १४४ च्या (१)(२)आणि(१)(३) च्या फौजदारी संहिता लागू करण्यात आली आहे . याव्दारे ड्रोन कॅमेरा अथवा ड्रोन सदृश कॅमेरा याने पालखी सोहळा कार्यक्रम चित्रीकरण करणेस मज्जाव आदेश प्रसिध्दी साठी प्राप्त झाला आहे. फेरी वाले फळ फुल विक्रेते खेळणी दुकानदार यांचे मुळे रस्ता अरुंद होतो पालखी मार्ग अरुंद झालेने गर्दी होते. चोर भुरटे याचा फायदा घेत अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळें दुतर्फा पालखी मार्गावर दुकाने लवणेस बंदी घातली आहे . नियमाचे उल्लंघन केल्यास आळंदी पोलिस कारवाई करणार असेलच आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलिस आयुक्त कार्यालयाने तसे आदेश जारी करत अध्यादेश प्रसिद्धीस दिला आहे