*पाणी रे ……पाणी*
*पाणी रे ……पाणी*
*आळंदीच्या पाणी प्रश्नावर विशेष रिपोर्ट*
भामासखेडचे पाणी पुणे महानगरपालिकेकडून मिळाल्यानंतर आळंदीकरांमध्ये उत्साह होता,मध्यंतरीच्या काळात पुणे महानगरपालिकेचा दम ,पाणी बंद होणार अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या, थकीत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा बंद करून अशी धमकी पत्र सूचना महापालिकेकडून आलेची चर्चा सर्वत्र रंगली, याबाबत आळंदी नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्याशी चर्चा आमचे प्रतिनिधि आरिफ भाई शेख यांनी चर्चा करतं माहिती घेता त्यामध्ये थकीत रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती मिळाली, प्रशासक मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की महापालिकेने दम वगैरे असं काही नाही देयक बिल अदा न झाल्यामुळे आणि त्याची पूर्तता न झाल्यामुळे सदरच्या बातम्या चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु नगरपालिका सक्षम आहे आणि कुठल्याही परिस्थितीत पाणी बंद केले जाणार नाही, त्याचबरोबर विकास आराखड्यामध्ये पाण्याची विशेष पाईप लाईन जोडून सुद्धा रोजच्या रोज पाणी देणे टेक्निकल दृष्ट्या अशक्य असल्याचे दिसून आले, वेळोवेळी मीटिंग घेऊन ही रोज आळंदीकर पाणी साठी वंचित च राहतील , कोणत्याही परिस्थितीमध्ये रोज पाणी देणे आळंदीकरांना शक्य नाही अशी परिस्थिती आहे,तसेच गावठाणात दोन टाक्यांना विशेष पाणीपुरवठा होणारे पाईपलाईन मध्ये लिकेज असल्याने बरेच पाणी वाया जात आहे ,मुळात पाण्याचा प्रश्न हा पेटला असताना असे पाणी वाया जाणे , त्याकडे दुर्लक्ष राहणे योग्य नसल्याचेही मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले आमचे प्रतिनिधी यांनी याबाबत पाठपुरावा करत प्रशासक मुख्याधिकारी यांना त्याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे, तसेच मुख्याधिकारी प्रशंसक अंकूश जाधव यांनी येणाऱ्या काळामध्ये कुठल्या प्रकारचे पाणी बंद होणार नाही, अशी ग्वाही दिली आहे, तर लीकेज पाईपलाईनची ची अवस्था गाड्या जाऊन झाली असलेची शक्यता नाकारता येत नाही,रस्ता खोदून त्याबाबत योग्य ती तांत्रिक प्रक्रिया करून ते लिकेज काढण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली आहे,