श्रीरामपूर तालुक्यामध्ये अवैद्य दगड खाणी कोणाच्या आशीर्वादाने

प्रतिनिधी सागर शेटे
श्रीरामपूर तालुक्यामध्ये अवैद्य दगड खाणी कोणाच्या आशीर्वादाने.
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवालगत काही अवैध्य दगड खाणी मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे चालू असल्याची माहिती मिळाली. खात्री करून पाहणी केली एक नव्हे दोन नव्हे तर चक्क साप ते आठ खडी थ्रेशर चालू असल्याचे पहावयास मिळाले. खूप मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
याबाबत महसूल विभागाशी संपर्क केला असता तालुक्यामधील वळदगाव निपाणी शिवालगत एक खान परवानगी देण्यात आलेली आहे अशी माहिती देण्यात आली. तर इतर खाणी अवैध कशा चालू आहेत हे न सुटणारे कोडे उपस्थित झाले.
या खाणी मधून मशिनरीच्या साह्याने 50 ते 100 फूट खोल खोदकाम करून दगड फोडून खडी थ्रेशर राजरोसपणे तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर चालू आहे. शासकीय नियम मोडून करोडो रकमेचा महसूल बुडवून या खाणीत कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे. हे लोक कायद्यास न मानणारे आहेत की या लोकांना कोणी पडद्यामागून साथ देत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन खाणीचे मोजमाप, पंचनामा करून कारवाई करावी अशी विनंती करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
निपाणी व वळद गाव शिवालग दगड खाणकाम करण्यासाठी महसूल विभागातून एक खाणकाम परवानगी देण्यात आलेली आहे.
तहसीलदार -मिलिंद वाघ
यावर श्रीरामपूर महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.