टाकळीभान येथे शांतता समितीची बैठक

टाकळीभान येथे शांतता समितीची बैठक
टाकळीभान येथे येणारे गणेशोत्सव सण हा नागरिकांनी कोणताही वादविवाद न करता शांततेत साजरा करून त्याचा आनंद घ्यावा असे शांतता कमिटीच्या बैठकी प्रसंगी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे म्हणाले.
यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की गेल्या दोन वर्षापासून लोकांना कोणतेही सण उत्सव पूर्णपणे साजरे करता आले नाही, सध्या प्रदुर्भाव कमी असून नागरिकांनी गणेशोत्सव सणाचा आनंद घ्यावा, तसेच मंडळांनी रीतसर मंडळाच्या परवानगीचा अर्ज भरून आपण मंडळाच्या वतीने घेणाऱ्या कार्यक्रमाची माहिती द्यावी, सध्या आपल्याकडे पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून ग्राम सुरक्षा दल, स्वयंसेवक गावातील पदाधिकारी यांनी उत्सव शांततेत होण्यासाठी सहकार्य करावे, तसेच मोठ्या थप्पीच्या साऊंड सिस्टिम वापरायच्या नसून मंडळांनी दोन बेस व दोन टॉप वर मंडळाचे कार्यक्रम घ्यावेत अशी सूचना त्यांनी केली. तसेच मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे ते म्हणाले. कार्यक्रम प्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, सरपंच पती अप्पा यशवंत रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, भाजपचे महिला जिल्हा सरचिटणीस सुप्रियाताई धुमाळ, शिवसेनेचे कार्यकर्ते राधाकृष्ण वाघुले, आबासाहेब रणनवरे, लोकसेवा विकास आघाडीचे उपाध्यक्ष राऊसाहेब वाघूले, मुकुंद हापसे, सुनील बोडखे, महेंद्र संत, अक्षय कोकणे, संजय रणनवरे, बापू शिंदे, अमोल पटारे, चंद्रकांत थोरात ,राजेंद्र देवळालकर, पवार ,रमेश पटारे, आप्पासाहेब रणनवरे, शिवा साठे,भारत गुंजाळ, प्रकाश मुळे ,सतीश रणनवरे, गोटीराम दाभाडे, विजय आहेर हे,काँँ, रवींद्र पवार पो. शेंगाळे, बाबा सय्यद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितीबद्दल आभार प्राचार्य जयकर मगर यांनी मानले.